आठवड्याचे राशीभविष्य : 30 मे ते 5 जून 2021, 'या' राशीच्या व्यक्तींना दुर्घटनेपासून सावध राहण्याचा सल्ला; वादविवाद टाळा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 10:36 AM2021-06-01T10:36:24+5:302021-06-01T11:03:45+5:30

Weekly Horoscope 30 May to 5 June 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्यात आपण जीवनात मोठी भरारी घेऊ शकाल. आपण आपली बुद्धी, कौशल्य व कार्यक्षमतेच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. आपणास आपल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्णत्वास जातील. नोकरी करणाऱ्या जातकांची बदली संभवते. व्यापारी वर्गास कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागू शकतात. प्रवासात दमछाक होण्याची शक्यता असल्याने आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी. आपली प्राप्ती सुद्धा नेहमी प्रमाणेच होईल. खर्चात मात्र कपात होईल. त्यामुळे आपण खुश व्हाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उत्तम आहे. विवाहितांना मात्र आपल्या वैवाहिक जीवनातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्नशील राहावे लागेल. घरातील एखाद्या कामामुळे कुटुंबाची मानहानी होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. इतरांच्या भांडणात मध्यस्थी करू नये.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फले देणारा आहे. आपल्या योजना कार्यान्वित होऊन आपणास आर्थिक लाभ सुद्धा होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे असले तरी एखाद्या गोष्टीत आपण साशंक झाल्याने स्वतःला त्रास करून घ्याल. ह्या दरम्यान आपणास आपल्या मान - सन्मानाची काळजी वाटत राहील. आपल्या हातून एखादी चूक होऊन आपणास मान खाली घालावी लागेल असे सतत आपल्याला वाटत राहील. अर्थात हा आपला भ्रम असेल तेव्हा त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. असे असले तरी आपणास आपल्या शत्रूंवर करडी नजर ठेवावी लागेल. वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदारास समजून घेण्याच्या मनःस्थितीत आपण नसल्याने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनातील परिस्थिती आपणास अनुकूल असेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या रमणीय स्थळी फिरावयास जाऊ शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या खर्चात कपात झाल्यामुळे अनेक दिवसांपासून जाणवत असलेली आर्थिक चणचण आता संपुष्टात येईल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने जीवनशैलीत काही बदल होत असल्याचे जाणवेल. आपण आपले व्यक्तिमत्व खुलविण्याकडे लक्ष देऊन त्यासाठी खर्च सुद्धा कराल. सौंदर्य खुलल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम व स्नेह ह्यांच्या जोडीला रोमान्स सुद्धा वाढेल. प्रेमीजनांना त्यांची प्रियव्यक्ती खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल व त्यामुळे प्रणयी जीवनास बहर येईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपले काम बिघडू नये म्हणून आपल्या कामात इतरांचा हस्तक्षेप टाळावा. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा असून एखादा लहानसा सौदा सुद्धा व्यापार वृद्धी करण्यास कारणीभूत होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहिल्याने जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल.

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास आपले व्यक्तिगत जीवन व प्रियजनांशी असलेल्या संबंधावर अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या मध्यास आपले मन विचलित होईल किंवा बाहेरील एखादा तणाव आपणास त्रास देईल. त्यामुळे आपल्या व्यवहारात कठोरता येऊन आपणास गोंधळ झाल्याचे जाणवेल. प्रणयी जीवनात कटुता निर्माण होऊ नये म्हणून शांत राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास दूरवर राहणाऱ्या लोकांशी आपला संवाद वाढेल. कुटुंबियांच्या खुशीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस आपले भागीदार, मार्गदर्शक व इतर व्यापाऱ्यांशी संबंधात सुधारणा होईल. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागले नाही तरी मध्या पासून कारकिर्दीच्या बाबतीत ते गंभीरपणे विचार करू लागतील. आठवड्याच्या सुरुवातीस प्रकृती थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपणास बऱ्याच प्रमाणात यश प्राप्त करून देणारा आहे. आठवड्याची सुरवात काहीशी नाजूक अवस्थेत होईल व आपण एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत होण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीस आपल्या खर्चात वाढ झाली तरी मधल्या दिवसात ती कमी होईल. आपली कामगिरी उत्तम होईल. मात्र, त्यामुळे आपला अभिमान वाढून आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. व्यापारातील कामगिरी उत्तम होईल. आपल्या व्यापारात चोहोबाजूने लाभ होतील. आपल्या काही मित्रांना भेटण्याची व त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी आपणास मिळेल. एखाद्या मेजवानीचे आयोजन करू शकाल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी चांगला आहे. प्रियव्यक्तीसह फिरावयास जाऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आरोग्य उत्तम राहील. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी चांगलाच असेल. आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. ह्या प्रवासामुळे आपणास नवीन ऊर्जा प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. व्यापारीवर्गास आपल्या प्राप्तीत वाढ करण्याचे नवीन उपाय सुचण्याची शक्यता आहे. असे असले तरी आपणास गुंतवणूक सुद्धा करावी लागेल. आपल्या खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. विरोधकांपासून सावध राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक दृष्ट्या चिंताग्रस्त व्हाल. आपणास आर्थिक चिंता सुद्धा भेडसावतील. अशा परिस्थितीत आपणास आपले काम व आर्थिक स्थितीचा विचार करून त्यानुसार पाऊल उचलावे लागेल. व्यापारीवर्गास खूप काळजी घ्यावी लागेल. विनाकारण आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे होणार नाही. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होऊन त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. प्रणयी जीवनात वाद होऊन कटुता निर्माण होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. कुटुंबियांच्या खुशीसाठी आपण एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकाल. आपल्या मनःस्थितीवर आपले आरोग्य अवलंबून राहील, तेव्हा स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कुटुंबियांसह वेळ घालविण्यास प्राधान्य द्याल. कुटुंबियांच्या गरजा समजून घ्याल. त्याच्य बरोबर नोकरीसाठी सुद्धा आवश्यक तितका वेळ द्याल. त्यामुळे जीवनातील समतोल साधला जाईल व ते आपणास जास्त आवडेल. आपण शिस्तीत राहण्यास प्राधान्य द्याल. तसेच कुटुंबियांकडून सुद्धा शिस्त पालनाची अपेक्षा बाळगाल. त्यामुळे काही वाद निर्माण होऊ शकतात. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी चांगला आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपण आपल्या जोडीदारासह किंवा सासुरवाडी कडील लोकांसह फिरावयास जाण्याची योजना आखू शकाल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी आपली कामगिरी सुद्धा उत्तम होईल. व्यापाऱ्यांना प्रवासामुळे काही फायदे होतील.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. आपणास आपल्या मित्रांना भेटण्याची इच्छा होईल, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने आपण काहीसे त्रासून जाल व थोडे गुमसुम व्हाल. कामाच्या बाबतीत मात्र आपली कामगिरी उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांमुळे आपणास काही लाभ होईल. ते खऱ्या अर्थाने आपले सहयोगी होतील. आपणास मदत करतील. व्यापारी वर्गास सुद्धा आपल्या कामात यश प्राप्त होईल. मात्र, काही गैरसमजामुळे मानहानी होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. विवाहितांना आपल्या सासुरवाडी कडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. सासुरवाडीस एखादा समारंभ आयोजित होण्याची शक्यता असून आपण त्यात सहभागी व्हाल. त्यामुळे आपल्या मनास प्रसन्नता लाभून नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीसह मौज करण्याची संधी मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. अचानकपणे आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीसच आपण धन वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न कराल. प्राप्तीत कशी वाढ होईल ह्यावर विचार - विनिमय कराल. व्यापारात मोठे यश प्राप्त होईल. आपली एखादी युक्ती यशस्वी झाल्याने आपणास मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळेल. मात्र, त्यासाठी आपणास आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास सुद्धा संपादन करावा लागेल. वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल. आपला जोडीदार आपणास तृप्त करेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद मोकळेपणाने घेऊ शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपण कुटुंबियांसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. आपली प्रकृती उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखादी मोठी चिंता सतावण्याची शक्यता असून त्यातून बाहेर पडण्यास आपल्याला खूप वेळ लागेल. मात्र, आपण जेव्हा त्यातून बाहेर पडाल तेव्हा परिस्थिती आपणास अनुकूल झालेली असेल. नोकरीतील आपले स्थान बळकट झाले तरी आपल्या मागे काही विरोधक व मित्र कट - कारस्थान रचतील, तेव्हा आपणास सावध राहावे लागेल. खर्चात वाढ होईल. प्रकृतीत चढ - उतार येतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढून परस्पर तणाव कमी होतील. त्यामुळे संबंधात सुधारणा होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी मात्र त्रासदायी होऊ शकतो. आपल्यात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या खर्चात जरी वाढ झाली तरी आठवड्याच्या मध्यास त्यात कपात होऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. एखाद्या चुकीच्या बातमीमुळे कुटुंबीय आपल्यावर आळ घेण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. नोकरी करणाऱ्या जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत आपण आपले प्रयत्न करतच राहावे. आपण जर व्यापार करत असाल तर आपल्या नफ्यात मोठी वाढ होऊन आपले मनोबल वाढेल. आपली धाडसी वृत्ती वाढून आपल्या व्यापारास त्याचा आणखीनच फायदा होईल. हा आठवडा व्यापारात गुंतवणूक करण्यास उत्तम आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तमच आहे. आपल्या नात्यात प्रेम व रोमान्स वाढेल. आपल्या प्रियव्यक्तीस आपण एखादा महागडा मोबाईल घेऊन देऊ शकाल. आपल्या प्रियव्यक्तीशी दीर्घकाळ गप्पा मारू शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास कौटुंबिक समस्या भेडसावतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी वाद झाल्याने आपले मन उदास होईल. ह्या स्थिती पासून दूर राहण्यासाठी आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदारासाठी हा आठवडा उन्नतीदायक राहील. प्रेमीजनांना अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हि अनुकूल परिस्थिती आपल्यासाठीच आहे. आपल्या प्रियव्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा फायदा होईल. त्यांना कामा निमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. ह्या प्रवासामुळे आपली ओळख निर्माण होईल. व्यापाऱ्यांना अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी एखादी नवीन युक्ती वापरावी लागेल. प्रकृती उत्तम राहील. असे असले तरी बाहेरील पदार्थ खाऊन घश्याला त्रास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.