आठवड्याचे राशीभविष्य : 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2021, कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार; 'या' राशीच्या व्यक्तींच्या घरात आनंद येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:00 AM2021-09-21T10:00:07+5:302021-09-21T10:05:01+5:30

Weekly Horoscope 19 September to 25 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपणास विविध प्रकारचे विचार करावयास लावणारा आहे. आपल्या प्राप्तीत सतत होणारी वाढ आपणास आनंदित तर करेलच, शिवाय काही खर्च विनाकारण करावयास लावेल, ज्याचा नंतर आपणास पश्चाताप सुद्धा होईल. आपल्या मनातील रोमँटिक भावना वाढेल. त्यामुळे आपले प्रणयी किंवा वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. आपली स्वतःची स्थिती मजबूत होईल. मात्र आपल्या वाणीत दोष निर्माण होऊ शकतो. निष्कारण लोकांना आपण त्रास देत असल्याचे आपणास जाणवेल. ह्या दोषामुळे आपली माणसे सुद्धा आपले शत्रू होऊ शकतात. हि संवय आपणास सोडावी लागेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आपणास रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे चांगले परिणाम मिळून त्यांची नव्याने ओळख निर्माण होईल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली कामे एखाद्या पूजे प्रमाणे एकाग्रतेने केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. आपली प्राप्ती वाढेल. आपल्या आवडीच्या ठिकाणी आपली बदली होऊ शकेल. त्याच बरोबर आपली पदोन्नती सुद्धा संभवते. हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या कामात चुका करू नका. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी चांगला आहे. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह आपल्या पैश्यांचा सदुपयोग कराल. ह्या दरम्यान आपण वैवाहिक जोडीदारासह फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. प्रेमीजनांना काही तणावास सामोरे जावे लागेल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नका. आठवड्याच्या अखेरीस सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून आपले व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न आपण कराल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता आहे. ह्या प्रवासामुळे आपणास मानसिक शांतता मिळेल. ह्या व्यतिरिक्त आपणास आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या आठवड्यात आपले मित्र व नातेवाईक ह्यांची आपणास खूप मदत होईल. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असले तरी अधून - मधून एखादी समस्या पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या कामात कोणीही चूक काढू शकणार नाही. ह्या उलट आपल्या कामाची प्रशंसा करण्यात येईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. आपणास आपल्या भागीदारावर अवलंबून राहावे लागेल. प्रेमीजनांच्या जीवनात प्रेम जरी भरपूर असले तरी एखाद्या बाबतीत मतभेद होण्याची शक्यता असल्याने त्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा उत्तम आहे. आपला वैवाहिक जोडीदार कुटुंबाचा विचार प्राधान्याने करेल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी उष्ण प्रवृत्तीचे भोजन टाळणे आपल्या हिताचे होईल.

आठवड्याच्या सुरवातीस आपणास वैयक्तिक जीवनात विलंब व समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आपल्या वैवाहिक जीवनात आपण जर एखाद्या असंतोषास किंवा समस्येस सामोरे जात असाल तर ह्या आठवड्यात त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नात्यात व संबंधात असलेल्या ह्या समस्या आपणास अधीर व आक्रमक करण्याची शक्यता आहे. अधीरता व आक्रमकता ह्यामुळे आपणास आपल्या नात्यात कटुता सोसावी लागेल. आठवड्याच्या मध्यास गंभीर नेत्र विकार संभवतात. आपल्या आहाराच्या संवयीत बदल करावा. अतिरिक्त भोजन करण्याची आपली संवय बदलावी लागेल. ह्या दरम्यान अंग दुखी व पोटाला सूज ह्या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना धीर धरण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस काही बाबतीत मौन बाळगणे आपल्या हिताचे होईल. ह्या आठवड्यात भागीदारी, संयुक्त उद्योग, न्यायालय, कार्यालय, सार्वजनिक व सामाजिक जीवनावर आपणास अधिक लक्ष द्यावे लागेल.

हा आठवडा आपणास आपले जीवन सुलभतेने व्यतीत करण्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या मध्यास आपण धार्मिक कार्ये कराल व आपले मन सांसारिक कामातून विरक्त होऊ लागेल. असे असले तरी आठवड्याचा उत्तरार्ध अत्यंत चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. ते आपल्या मनःस्थितीत चांगला बदल घडवून आणतील. त्यांच्यासह एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. आपली बँकेतील शिल्लक वाढेल. सरकारी क्षेत्रा कडून लाभ संभवतो. आपल्या वाणीत अचानकपणे कटुता वाढल्याने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विनाकारण वड्याचे तेल वांग्यावर काढल्याने नात्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवन सुद्धा सुंदर होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना थोडे सावधपणे काम करावे लागेल. आपल्या सहकाऱ्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपणास स्वतःवर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आपण क्रोधीत व्हाल, व लहान - सहान गोष्टींमुळे आपला राग उफाळून येईल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण आपले शत्रू निर्माण करण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी स्वतः शांत राहावे. आपल्या प्रणयी जीवनात आनंद वाढेल. वातावरण आपणास अनुकूल असल्याचे दिसल्याने आपले मन हर्षित होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामांचा चांगला लाभ मिळेल. आपल्या प्रत्येक कामात कुटुंबियांचा पाठिंबा आपणास मिळेल. परंतु त्यामुळे आपणच सर्वस्व असल्याची भावना निर्माण होऊन आपला घमंड वाढेल. असे होण्या पासून दूर राहावे. आपण मनाने खुश व्हाल. आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. कुटुंबात एखादा समारंभ होण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्यापैकी काही जणांना सरकारी खर्चाने परदेशवारी करण्याची संधी मिळेल. ह्या प्रवासाचा आनंद आपणास मिळू शकेल. आपण आपल्या गावी सुद्धा जाऊ शकाल. गावी जाऊन गत स्मृतींना उजाळा मिळाल्याने आपण अत्यंत आनंदित व्हाल. आपल्या डोळ्यात आनंदाश्रू येण्याची शक्यता सुद्धा आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपले प्रणयी जीवन प्रेमाने भरलेले असेल. आपली प्रियव्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुद्धा भरपूर प्रेम व रोमांस असल्याचे दिसून येईल. ह्या आठवड्यात आपणास नोकरीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना विदेशी संपर्कातून लाभ होईल.

ह्या आठवड्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. घराच्या गरजा समजून घेऊन त्यासाठी खर्च सुद्धा कराल. आपण आपल्या सुख सोयीत वाढ कराल व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यासाठी आपण भरपूर खर्च कराल. आरोग्य उत्तम राहील. प्राप्तीत मोठी वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनःस्थितीत होणाऱ्या बदलावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. आपणास आपल्या मित्रांसह मोठ - मोठ्या मेजवानीस जाण्याची संधी मिळाल्याने आपण अत्यंत आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांची आपल्या कामात प्रगती होईल. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ते आपल्यावर प्रसन्न होतील. व्यापाऱ्यांना मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याची सुरवातच एखाद्या प्रवासाने होईल. हा प्रवास जरी छोटा असला तरी आपणास काही मिळवून देणारा असेल. नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवन रोमांसाने परिपूर्ण असेल. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर खुश होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. अशा परिस्थितीत आपणास शांत राहावे लागेल. कौटुंबिक गरजा आपले लक्ष वेधून घेतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचे शुभ फल मिळेल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन आपणास पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कौशल्याची प्रचिती येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक देवाण - घेवाण होऊ शकेल. आपण बँकेतील शिल्लक वाढविण्याकडे सुद्धा लक्ष द्याल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल व आपण एकत्रितपणे कुटुंबास प्रगती पथावर नेऊन ठेवाल. कुटुंबात एखाद्या नव्या पाहुण्याच्या आगमनाने वातावरणात आनंद पसरेल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळेल. आपले नाते रोमांसाने परिपूर्ण असेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या भागीदारीत एखादा व्यवसाय सुद्धा सुरु करू शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. इतरांना मदत करण्यात आपण पुढाकार घ्याल. ह्या आठवड्यात आपल्या वडिलांना एखादी सिद्धी प्राप्त होऊ शकते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपले नाते संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. त्यामुळे कौटुंबिक जीवनातील आव्हाने संपुष्टात येतील. आपल्या सासुरवाडी कडील लोकांना आपल्या बरोबर काही गोष्टी करावयाच्या असल्याने आपणास त्यांच्या संपर्कात राहावे लागेल. त्यामुळे नात्यातील धुरळा सुद्धा दूर होऊ शकेल. हा आठवडा प्रेमीजनांना सावध राहण्याचा आहे. काही लोक आपल्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती नाजूक होण्याची शक्यता असल्याने आरोग्याप्रती बेफिकीर राहू नये. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. नोकरी करणाऱ्या जातकांना चढ - उतारांचा सामना करावा लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. सध्या व्यापाऱ्यांनी कोठेही आर्थिक गुंतवणूक करू नये, तसेच कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या गोष्टीने चिंतीत होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकुतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. मानसिक तणाव संपुष्टात आल्यावर आपली कामे होऊ लागतील. नशिबाची साथ मिळाल्याने व्यापारात व नोकरीत उन्नती होऊ शकेल. त्यामुळे आपली कामगिरी चांगली होऊन आपण प्रशंसित सुद्धा व्हाल. व्यापारात नवीन गिऱ्हाईके मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. शासनाकडून सुद्धा चांगला लाभ संभवतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतील. अशा स्थितीत जोडीदाराची मनःस्थिती बघून संवाद साधणे उचित ठरेल. प्रेमीजनांना नात्यातील सौंदर्य अनुभवास मिळेल. आपली प्रिय व्यक्ती आपले हृदय जिंकण्यास काही कमी पडू देणार नाही. हा आठवडा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उत्तम आहे. त्यांना चांगले परिणाम मिळतील. आपणास एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा होईल. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.