Nostradamus Predictions 2022: पृथ्वी घोर संकटात! महागाई, बिटक़ॉईन, विनाशावर नॉस्ट्रॅडॅमसची भयानक भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:01 PM2021-11-26T13:01:38+5:302021-11-26T13:14:30+5:30

Nostradamus Predictions for 2022: नॉस्ट्रॅडॅमसने 2022 साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्या जगासाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत. आपल्या एका पुस्तकात हजारो अशा घटनांची नोंद केली होती, ज्या भविष्यात जगभरात विध्वंस करणार होत्या. या पुस्तकात एकूण 6338 भविष्यवाण्या आहेत.

फ्रान्सचे जगप्रसिद्ध ज्योतिषी माइकल दि नॉस्ट्रॅडॅमस यांनी जगाबाबत हैराण करणाऱ्या भविष्यवाणी केल्या होत्या. नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या एका पुस्तकात हजारो अशा घटनांची नोंद केली होती, ज्या भविष्यात जगभरात विध्वंस करणार होत्या. नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. (Nostradamus Predictions for 2022)

नॉस्ट्रॅडॅमसने 2022 साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्या जगासाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत. त्यांनी 2022 मध्ये मोठमोठ्या संकटांचे संकेत दिले आहेत.

नॉस्ट्रॅडॅमसने 2022 बाबत केलेल्या भविष्यवाणीत म्हटले आहे की, पृथ्वीला खूप मोठे नुकसान होणार आहे. महत्वाचे म्हणजे हे नुकसान उल्कापिंडामुळे होणार आहे. विशालकाय दगड समुद्रात कोसळल्याने मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत. ज्या जमिनीला घेरणार आहेत. तसेच समुद्राच्या जलस्तरात वाढ झाल्याने मोठे नुकसान होणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये महागाई बेलगाम होणार आहे. वेगाने अमेरिकी डॉलर कोसळणार आहे. 2022 मध्ये लोक सोने. चांदी आणि बिटक़ॉईनलाच संपत्ती समजू लागणार आहेत. यामध्ये लोक जास्त पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमसच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये अणुबॉम्बच्या स्फोटामुळे हवामानात बदल होईल. यासोबतच पृथ्वीच्या स्थितीतही बदल होऊ शकतो.

2022 मध्ये विनाशानंतर शांतता नांदेल, असे नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे. याआधी ७२ तास जग अंधारात लोटले जाईल. शरद ऋतूतील पर्वतांवर बर्फवृष्टी होऊ शकते. एका नैसर्गिक घटनेमुळे अनेक देशांमधील युद्ध संपुष्टात येईल. तीन दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल.

2022 मध्ये फ्रान्सवर मोठे संकट येणार आहे. देशात मोठे वादळ येईल जे विनाश घडवेल. त्यामुळे जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत असेही म्हटले आहे की 2022 मध्ये संगणकाचा मेंदू मानवांवर नियंत्रण ठेवू शकतो. येत्या वर्षभरात, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी इंटरफेससह संगणकावर राज्य करेल. या रोबोट्समुळे मानवजातीचा अंत होईल.

नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत मेनोर्का बेटाजवळील भूमध्य समुद्रात क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पुस्तकात एकूण 6338 भविष्यवाण्या आहेत.

Read in English