Photos: "हर हर महादेव" च्या जयघोषात महाशिवरात्री उत्साहात साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 18:10 IST2022-03-01T18:06:47+5:302022-03-01T18:10:14+5:30
पुणे : पुणे शहरात हर हर महादेवचा गजर करत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, होम हवन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शहरातील सर्व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. नागरिकांच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी दूध आणि प्रसादवाटपही करण्यात आले. (सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे)