चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:53 PM2023-05-23T18:53:10+5:302023-05-23T19:04:41+5:30

मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे)

पुणे मेट्रोच्या भुयारातील शिवाजीनगर स्थानकाचे काम अखेर पूर्ण

स्थानकात एक कलादालन तयार करण्यात आले आहे

जमिनीच्या पोटात खोलवर असूनही श्वासोच्छ्वासाचा काहीच प्रश्न निर्माण होणार नाही. त्या नव्या जगाची ही छायाचित्र झलक

स्थानकातील तिकीट काऊंटरवर मागील बाजूस पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत

छान लाकडी महिरपींच्या आत पुण्याची ओळख असणाऱ्या वस्तू व वास्तूंच्या सुरेख फ्रेम्स

प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी म्हणून जगात कुठल्याच भुयारी मेट्रो स्थानकात नाही अशी ही व्यवस्था पुण्यात खास करण्यात आली आहे

मेट्रोच्या या शिवाजीनगर स्थानकात सुरक्षितता, स्वच्छता याबाबत काळजी घेणारे सर्व कर्मचारीही आहेत

फलाटाच्या दोन्ही बाजू या काचांनी बंदिस्त केल्या आहेत. मेट्रो आल्यानंतर या डब्यांच्या ठिकाणी असतील त्या काचांमधील दरवाजे फक्त खुले होतील.

मेट्रो मार्गाच्या नकाशाची माहिती देणारे स्क्रीन लावण्यात आले आहेत