शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

"मृतदेह पडले होते, एका मृतदेहाचे शिर तुटून दुसरीकडे पडले होते", प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:45 IST

1 / 7
अजित पवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत पोहोचणार होते. पण, विमान उतरण्यापूर्वीच मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. अजित पवार आणि इतर चौघे विमान अपघातात जागीच ठार झाले.
2 / 7
विमानाचा स्फोट झाल्यानंतरची परिस्थिती भयंकर होती. विमान जळून कोळसा झाले. मृतदेह दूर उडाले. काही मृतदेहांचे अवयव तुटले होते. तर काही भाजले होते. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या महिलांनी जो घटनाक्रम घडला, तो थरकाप उडवणार आहे.
3 / 7
प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले, 'पहिल्यांदा विमान आले आणि घरावरून गेले, त्यावेळी चांगले होते. आम्ही घरच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना चारा टाकला आणि आलो. तेव्हा पहिल्यांदा वरून गेलेले विमान खूप खालून आले.'
4 / 7
'त्यानंतर ते खाली आले आणि त्याचा खूप मोठा स्फोट झाला. ते खालीच फिरले. ते विमान धावपट्टीवर गेलेच नाही. त्याचा जागेवरच स्फोट झाला. आम्ही एवढे घाबरलो', असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.
5 / 7
'मग आम्ही गेलो. तिथे १५ मिनिटांनी पोलीस आले. आम्ही घरून पाणी घेऊन गेलो. विझवले. तो मृतदेह असा बाजूला पडलेला होता. मुंडके पूर्ण बाजूला पडलेले होते. अर्धाच मृतदेह पडलेला होता. आम्ही तो मृतदेह बघितला', असे प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाली.
6 / 7
'पोलीस म्हणाले कपडे वगैरे... तर मग आम्ही ब्लँकेट घेऊन गेलो आणि मृतदेह झाकले. १५-२० मिनिटांनी गाडी आली आणि मग तो मृतदेह गुंडाळून नेण्यात आले. खूपच वाईट झाले', असे सांगत प्रत्यक्षदर्शी महिलेने हळहळ व्यक्त केली.
7 / 7
'ते बघून आम्ही खूप घाबरलो. पण, आम्ही कपडे नेले आणि पडलेले मृतदेह झाकले. मृतदेह घेऊन जाईपर्यंत आम्ही तिथेच होतो', असे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस