संजय राठोड आज येणार सर्वांसमोर, तत्पूर्वी पूजा चव्हाणसोबतचे अजून काही फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 08:56 AM2021-02-23T08:56:26+5:302021-02-23T09:11:39+5:30

Sanjay Rathod & Pooja Chavan's Some more photos viral : महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड हे आज सर्वांसमक्ष येत असतानाचा संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे अजून काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. (Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड हे अडचणीत सापडले आहेत. विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान, मंत्री संजय राठोड हे आज बंजारा समाजाचे पवित्र स्थान असलेल्या पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार आहेत. त्यानिमित्ताने या प्रकरणी झालेल्या आरोपांनंतर ते प्रथमच सर्वांसमोर येणार आहेत.

दरम्यान, संजय राठोड हे सर्वांसमक्ष येत असतानाचा संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे अजून काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये पूजा राठोड वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांनी एकत्रित फोटोसेशन केलेले दिसत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आपली कुणाविरोधातही तक्रार नसल्याचे पूजाच्या वडलांनी सांगितले आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने रविवार, ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. तसेच महाविकास आघाडीमधील एका मंत्र्याचे नाव समोर आले होते.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड हे बेपत्ता झाले होते.

आता संजय राठोड हे आज सर्वांसमक्ष आल्यावर या प्रकरणावर काय बोलतात. तसेच त्यांचे समर्थक कशाप्रकारे शक्तिप्रदर्शन करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read in English