Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क
By प्रविण मरगळे | Updated: March 2, 2021 15:19 IST
1 / 10पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, वनमंत्री संजय राठोड यांच्या निमित्ताने ठाकरे सरकारमधील पहिल्याच मंत्र्याचा राजीनामा घेण्यात विरोधकांना यश आलं, गेल्या अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे सरकारविरोधात संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2 / 10वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशना चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता, त्याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्य पूर्वसंध्येला संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला, परंतु या निमित्ताने आता विरोधकांनी आणखी एका मंत्र्याविरोधात आवाज उठवला आहे. 3 / 10एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला होता, या प्रकरणामुळेही सरकारची अडचण झाली होती, परंतु संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण कुठेतरी शांत झालं, परंतु संजय राठोड यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 4 / 10धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने आरोप केल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट सर्वांसमोर उघड झाली, महिलेसोबत परस्पर संबंध ठेवणे आणि तिला दोन मुलं असणे हे संपूर्ण प्रकरण धनंजय मुंडे प्रकरणात समोर आलं होतं, लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या महिलेसोबत संबध ठेवणे यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. 5 / 10संजय राठोड प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला, तसाच राजीनामा धनंजय मुंडे यांचाही घेण्यात यावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. इतकचं नाही तर धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा धनंजय मुंडे यांनीही संजय राठोड प्रकरणानंतर आम्ही न्याय मागतो, भीक नाही म्हणत या प्रकरणावर भाष्य केले आहे. 6 / 10पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांची अडचण वाढली तसेच करूणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात विधान केले आहे, आणखी किती पूजाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? असा सवाल करूणा यांनी विचारला होता. त्यामुळे संजय राठोडानंतर आता धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यावा लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. 7 / 10या प्रकरणात सावध भूमिका घेतलेल्या पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे. संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यायला हवा, तशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला, आता निपक्षपातीपणे यंत्रणांनी तपास करावा. केवळ याच बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत तपास यंत्रणांनी हीच भूमिका घ्यावी. राजीनामा दिल्याने कोणाची प्रतिमा चांगली होत नाही, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्यांनी तो द्यावा असं विधान पंकजा मुंडे यांनी मांडलं. 8 / 10तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 9 / 10विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला होता, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तसा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? त्यात सीएम म्हणाले होते, की त्यांच्या प्रकरणात महिलेने तक्रार मागे घेतली, मग प्रतिप्रश्न केला की संजय राठोड यांच्याप्रकरणात तक्रार नाही तरीही राजीनामा घेतला त्यावर सीएम बोलले की नैतिकदृष्ट्या त्यांनी हा राजीनामा दिला आहे, 10 / 10त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मंत्र्यावर कारवाई केली तशीच आता हीच नैतिकता शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबाबतीत दाखवणार का? असा प्रश्न आहे. संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.