शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 06:16 IST

छत्रपती संभाजीनगरात रविवारी प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह विविध ठिकाणी मोठ-मोठी सरकारी आणि खासगी रुग्णालये आहेत. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना आणत आहोत. लवकरच त्याला कॅबिनेटची मान्यता मिळेल. तमिळनाडूपेक्षा अधिक चांगले काम राज्यात होईल आणि एक नवीन इंडस्ट्री तयार होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरात रविवारी प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजनेचा शासन निर्णय लवकरच येईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, ‘ईएसआयसी’ प्रमाणे  रुग्णालयांना सोबत घेऊन या योजनेत काम केले जाईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पूर्वी दीड हजार कोटी रुपये खर्च होत असे. आता ५ हजार ते साडेपाच हजार कोटी खर्च हाेतात, असे आबिटकर यांनी सांगितले. 

मध्यरात्री  अधिकाऱ्यांची कानउघडणी

मंत्री आबिटकर हे शनिवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले. रात्री १ वाजता त्यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांच्या खाटेवरील बेडशिट बदलण्याकडे दुर्लक्ष, बंद किमाेथेरपी सेंटरसह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पाच खाटांपर्यंत मान्यता

खाटांपर्यंतच्या ‘डे केअर सेंटर’च्या रुग्णालयांना मान्यता देण्याची डाॅक्टरांकडून मागणी आहे. त्याला मान्यता दिली जात आहे.

जिल्हा रुग्णालयांमध्ये अवयवदान होण्याच्या दृष्टीने रोटो-सोटो कमिटी (क्षेत्रीय तसेच राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटना) विकसित करत आहोत.

राज्यस्तरावर त्याचा ‘डॅश बोर्ड’ केला जाईल. हिमोफिला रुग्णांसाठी महत्वपूर्ण असलेले ‘हेमलिब्रा’ हे औषध लवकरच उपलब्ध होईल. या औषधीच्या खरेदीसाठी ४ कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.

परदेशी रूग्णांसाठी  ‘व्हॅल्यू टुरिझम’ योजना

या योजनेत परदेशातील रुग्णांना महाराष्ट्रात उपचार, शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळेल.

त्या अनुषंगाने विविध देशांशी, तेथील रुग्णालयांशी करार केले जातील. उपचारार्थ येणाऱ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया योजनेंतर्गतच दिली जाईल.

बालकांचा बळी, ४ बिबट्यांना जन्मठेप

नाशिक : वडनेर दुमाला शिवारात बालकांवर हल्ला करणारे दोन आणि सिन्नर वनपरिक्षेत्रातील दोन अशा  चार बिबट्यांना आयुष्यभरासाठी कैदेत ठेवले जाणार आहे. याबाबत वनविभागाचा निर्णय झाला आहे. मात्र, अन्य बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयांतर्गत समितीकडून नाशिक वनविभागाला आदेश प्राप्त झालेले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Launch 'Medical Value Tourism' Scheme Soon: Health Minister

Web Summary : Maharashtra will soon launch a 'Medical Value Tourism' scheme, modeled after Tamil Nadu, offering affordable medical treatments to foreign patients. The scheme aims to boost medical tourism with streamlined visa processes and collaborations with international hospitals. Four leopards involved in attacks will be held captive for life.
टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकर