फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण, त्या घटनेनं असं बदललं महाराष्ट्राचं राजकारण
Published: November 23, 2020 09:26 AM | Updated: November 23, 2020 09:48 AM
Devendra Fadnavis News : आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते.