शरद पवारच नव्हे, 'हे' नेतेदेखील पडलेत मोदी-शहांना भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:47 PM2019-12-04T14:47:33+5:302019-12-04T14:52:42+5:30

शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्याची किमया साधली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपाची प्रत्येक खेळी शरद पवारांनी निष्प्रभ केली.

अरविंद केजरीवाल- २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं दणदणीत विजय मिळवला. मात्र २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं ७० पैकी ६७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. मोदी-शहा जोडीसाठी हा मोठा धक्का होता.

ममता बॅनर्जी- ममता बॅनर्जी आणि मोदी-शहांमधले विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र ममता बॅनर्जींनी बहुमत मिळवत भाजपाच्या स्वप्नांना जोरदार धक्का दिला.

नवीन पटनायक- ओडिशात शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. मात्र बीजू जनता दलाचे नवीन पटनायक यांच्यामुळे भाजपाला अद्याप ओदिशात मोठं यश मिळालेलं नाही. बीजू जनता दलाला एकहाती यश मिळवून देण्याची किमया पटनायक यांनी अनेकदा साधली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग- सध्या पंजाबचे मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व केलं. त्यांच्या रणनीतीपुढे भाजपा-अकाली दल यांची आघाडी हतबल ठरली. विशेष म्हणजे केंद्रीय नेतृत्त्वाकडून फारसं सहकार्य नसताना अमरिंदर यांनी काँग्रेसला पंजाबमध्ये अच्छे दिन दाखवले.

अशोक गहलोत- २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत गहलोत यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसचं नेतृत्त्व केलं. त्यांच्या अनुभवी नेतृत्त्वामुळे काँग्रेसला राज्यात यश मिळालं आणि राजस्थान भाजपाच्या हातून गेलं.

भूपेश बघेल- २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भूपेश बघेल यांनी अकल्पनीय कामगिरी केली. छत्तीसगडमधील १५ वर्षांची भाजपा राजवट उलथवण्यात बघेल यशस्वी ठरले. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या जागा ४९ वरुन १५ वर येतील, याची कल्पना निवडणुकीपूर्वी कोणीही केली नव्हती.