PHOTOS: पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद, मोर्चा शांततेत; पोलिसांचा चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:08 IST2023-09-09T14:50:03+5:302023-09-09T15:08:02+5:30
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि.९) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला पाठिंबा म्हणून रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि शहरातील इतर भाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. (सर्व फोटो- अतुल मारवाडी)

पिंपरी-चिंचवड शहरात आज कडकडीत बंद पुकारला होता.
यावेळी मराठी बांधवांकडून शांततेत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात महिलांचाही समावेश होता
'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे', 'जय भवानी जय शिवाजी', अशा घोषणा मोर्चातील मराठी बांधवांनी दिल्या
आजच्या बंदला मुस्लीम बांधवांनीही पाठिंबा दर्शविला होता.
शहर बंद असल्याने मार्केटही ठेवण्यात आले होते
मार्केटमधील शुकशुकाट
यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.