शेतकरी संघर्ष समितीतर्फे परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:04 IST2018-05-16T19:04:27+5:302018-05-16T19:04:27+5:30

रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़
या प्रकरणी रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली, यावेळी परभणी रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबली होती
गंगाखेड येथेही असेच आंदोलन करण्यात आले
यात विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली
गंगाखेडमधून जाणाऱ्या महामार्गावर यामुळे वाहतूक कोंडी झाली होती