Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:18 PM2021-08-08T17:18:44+5:302021-08-08T17:31:40+5:30

Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: नीरज चोप्राचे सुवर्ण, मीराबाई चानू व रवी कुमार दहिया यांचे रौप्य आणि पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोईन व पुरुष हॉकी टीमचे कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

भारतीय खेळाडूंनी शनिवारी दोन पदकं जिंकली, त्यात कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या कांस्यचा समावेश होता, तर भालाफेकीत नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यामुळे १३ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे राष्ट्रगीत ऐकायला मिळाले.

आज ऑलिम्पिक स्पर्धेचा निरोप समारंभ थाटात पार पडला. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजधारक म्हणून दिसला. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं ४८ वे स्थान पटकावलं.

अमेरिकेनं ३९ सुवर्ण, ४१ रौप्य व ३३ कांस्य अशा एकूण ११३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, चीनला ८८ पदकांसह ( ३८ सुवर्ण, ३२ रौप्य व १८ कांस्य) दुसऱ्या आणि यजमान जपानला ५८ पदकांसह ( २७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Read in English