अभिमानास्पद..! कुश मैनी Formula 2 Sprint Race जिंकणारा ठरला पहिला भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 01:24 IST2025-05-26T00:59:03+5:302025-05-26T01:24:53+5:30

..अन् पहिल्यांदाच फार्मुला २ च्या स्पर्धेनंतर वाजलं भारताचं राष्ट्रगीत

भारताच्या कुश मैनी याने मोनाको ग्रां प्री येथील फॉर्म्युला २ स्पिंट' शर्यत जिंकत एक नवा इतिहास रचला आहे.

ही प्रतिष्ठित शर्यत जिंकणारा तो पहिला भारतीय फार्म्युला २ ड्रायव्हर ठरला आहे.

डॅम्स लुकास ऑइल (DAMS Lucas Oil) टीम कडून मैनी याने कमालीच्या नियंत्रणासह सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत थरारक शर्यत जिंकली.

ही स्पर्धा जिंकणं फक्त कुश मैनीसाठीच नव्हे तर भारतासाठी ऐतिहासिक क्षण ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे F2 शर्यतीत पहिल्यांदाच राष्ट्रगीत वाजल्याचे पाहायला मिळाले.

ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकल्यावर कुश मैनी याने आपल्या इथंपर्यंतच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

आता त्याच्या नजरा या बार्सिलोना ग्रां प्री शर्यतीवर आहेत. फीचर रेसनंतर तो बार्सिलोना ग्रां प्रीच्या तयारीला लागणार आहे.

कुश मैनी हा अल्पाइन अकादमीचा भाग असून DAMS साठी FIA फॉर्मुला २ चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे.

याशिवाय कुश मैनी अल्पाइनसाठी फॉर्मुला वन तर महिंद्राकडून फॉर्मुला ई साठी राखीव ड्राइव्हरच्या रुपात काम करतो.

एतिहासिक कामगिरीबद्दल प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील भारतीय फार्मुला शर्यत जिंकणाऱ्या कुश मैनीचं अभिनंद केले आहे.