सुट्टीला बेटावर गेली; तिथं जाऊन ३०० रुपयांंचंं पुस्तक वाचलं! परत आली अन् ४,४०,८०,००० रुपये कमावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:18 IST2025-09-12T16:48:11+5:302025-09-12T17:18:17+5:30

इथं जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी

पुस्तक वाचण्याचा छंद हा केवळ तुमच्या माहितीत भर घालत नाही, तर तुमच्या बुद्धीला चालना देतो. एवढेच नव्हे, तर काही पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्याला कलाटणी देणारे धडेही मिळतात. हीच गोष्ट या स्टार टेनिसपटूच्या बाबतीतही घडलीये.

इथं आपण टेनिस जगतातील हॉट अँण्ड ब्युटीफूल महिला टेनिसपटूला ३०० रुपयांच्या पुस्तकामुळे कशी मदत झाली? त्यासंदर्भातील स्टोरी जाणून घेणार आहोत.

ही टेनिसपटू म्हणजे बेलारुसची सुंदरी आर्यना सबालेंका. २०२५ च्या विम्बल्डनच्या कोर्टवर अमेरिकन अमांडा अनिसिमोव्हा हिने तिला सेमी फायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता.

या पराभवानंतर बेलारुसच्या टेनिसपटून ब्रेक घेतला अन् कणखर मानसिकतेसह पुन्हा कोर्टवर उतरत २०२५ च्या हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत इतिहास रचला.

पण तुम्हाला माहितीये का? ही स्पर्धा जिंकून जवळपास ४,४०,८०,००० रुपये एवढे बक्षीस जिंकण्यासाठी तिला जे बळ मिळालं त्याचं खास कनेक्शन फक्त एका ३०० रुपयांच्या पुस्तकात दडलंय. इथं जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी

आर्यना सबालेंका विंबल्डनमधील पराभवानंतर सुट्टीसाठी ग्रीकच्या मायकोनोस बेटावर गेली होती. बेटावर जााऊन तिनं बोल्ड अँण्ड ब्यूटीफूल अंदाजातील फोटोशूट केलेच. पण यावेळी तिनं मित्रांनी वारंवार सुचवलेलं जेम्स आर. डोटी यांचं सर्वाधिक विकले गेलेले ‘इनटू द मॅजिक शॉप’ (Into the Magic Shop) हे पुस्तक वाचून काढलं.

आर्यना सबालेंका विंबल्डनमधील पराभवानंतर सुट्टीसाठी ग्रीकच्या मायकोनोस बेटावर गेली होती. बेटावर जााऊन तिनं बोल्ड अँण्ड ब्यूटीफूल अंदाजातील फोटोशूट केलेच. पण यावेळी तिनं मित्रांनी वारंवार सुचवलेलं जेम्स आर. डोटी यांचं सर्वाधिक विकले गेलेले ‘इनटू द मॅजिक शॉप’ (Into the Magic Shop) हे पुस्तक वाचून काढलं.

रिफ्रेश होण्यासाठी शांत अन् निसर्गाच्या सानिध्यात घेतलेला आनंद अन् ते पुस्तक वाचण्याला दिलेली पसंती ही तिच्या फायद्याची ठरली. खुद्द टेनिस स्टारनंच यासंदर्भातील गोष्ट शेअर केलीये.

टेनिस स्टार या पुस्तकाबद्दल म्हणालीये की, माझ्या मित्रांनी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता. हे पुस्तक विलक्षण आहे, प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.

हे पुस्तक वाचून मी खूप गोष्टी शिकले. ते मला योग्य वेळी योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, असे ती म्हणाली आहे. मानसिकरित्या स्थिर राहणं या पुस्तकामुळं शक्य झालं, असा उल्लेख तिने केला आहे.