Happy Birthday 'The Flying Sikh' मिल्खा सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:59 AM2018-11-20T11:59:24+5:302018-11-20T12:14:23+5:30

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा ठसा उमटवणाऱ्या मिल्खा सिंग यांचा आज 89 वा वाढदिवस

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू

मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते

त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते

त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले

1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.

20 नोव्हेंबर 1929 मध्ये त्यांचा जन्म... भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीत त्यांच्या आई-वडीलांची हत्या झाली होती.

1960 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी अब्दुल खालिकला पराभूत केले होते. पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान यांनी त्यांना 'The Flying Sikh' हे नवे नाव दिले.