FIFA World Cup: प्रक्षोभक ड्रेस घालून मॅच पाहायला आली ॲडल्ट स्टार; नेटकऱ्यांनी घेतली 'नियमांची' शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:08 PM2022-12-05T14:08:14+5:302022-12-05T14:13:39+5:30

फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यादरम्यान ॲडल्ट स्टार ॲस्ट्रिड वेट हिने प्रक्षोभक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. तिने तिच्या ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. दरम्यान, सामना पाहण्यासाठी तेथे पोहोचलेले स्टार्सही चर्चेत आहेत. आता सध्या सर्वत्र एका ॲडल्ट स्टार्सची चर्चा आहे. खरं तर ही स्टार सामना पाहण्यासाठी प्रभोक्षक कपडे परिधान करून गेली होती.

फिफा विश्वचषकाचा थरार पाहायला ब्रिटनची ॲडल्ट स्टार ॲस्ट्रिड वेट हिने प्रक्षोभक कपडे घालून हजेरी लावली होती. खरं तर ती चेल्सी आणि इंग्लंडची मोठी चाहती आहे. ओन्लीफॅन्स या प्रौढ वेबसाइटवर ती खूप लोकप्रिय आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यादरम्यान ती अतिशय प्रक्षोभक ड्रेस परिधान करून सामना पाहायला गेली होती. तिने स्वत: तिच्या ट्विटर हँडलवरून हे फोटो शेअर केले आहेत. मात्र आता चाहत्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी तिला नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. असा ड्रेस घातल्याने तिला तिथे अटक देखील होऊ शकते.

एका व्यक्तीने तिला ट्विट करत म्हटले, "ॲस्ट्रिड हा कतार आहे, इंग्लंड नाही." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "स्वतःला झाकून ठेवा, इतर देशाच्या नियमांचा आणि संस्कृतीचा आदर करा." लक्षणीय बाब म्हणजे फिफा विश्वचषकाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कतार प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली होती. ज्याच्यामध्ये छोटे कपडे घालणे यासह प्रक्षोभक कपडे घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे नमूद आहे.

कतारच्या सरकारने विश्वचषकापूर्वी सांगितले होते की, पुरुष तसेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक कपडे घालणे टाळावे आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ॲडल्ट स्टार ॲस्ट्रिड व्हेटने बेडरूमचा सेल्फी शेअर केला होता. ज्यामध्ये पाहायला मिळते की तिच्या हातामध्ये विश्वचषकाची ट्रॉफी आहे.

माजी मिस क्रोएशिया आणि मॉडेल इव्हाना नॉल सतत प्रत्येक सामन्यात आक्षेपार्ह ड्रेस परिधान करून येत असते. त्यामुळे तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र नॉलने म्हटले आहे की तिला अटकेची भीती वाटत नाही