लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी धक्कादायक सत्य सांगितलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:38 IST2025-03-03T18:29:26+5:302025-03-03T18:38:10+5:30
......मात्र, मुलाने याला नकार दिला आहे. तसेच आपण सून म्हणून संबंधित नववधूचा स्वीकार करणार नाही, असे वराच्या वडिलांनी म्हटले आहे.

लग्न अथवा वधू-वरांसंदर्भात आपण अनेक घटना बघितल्या अथवा ऐकल्या असतील. मात्र, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून एक अशीच घटना समोर आली आहे, जी ऐकूण आपल्यालाही धक्का बसेल.
येथे एक तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन आला. यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, नवरीच्या अथवा वधूच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला, वधूने वेदनेकडे दुर्लक्ष केले. मात्र वेदना अधिक वाढल्यानंतर तिने यासंदर्भात सासरच्यांना यासंदर्भात माहिती दिली.
यानंतर सासरच्यांनी वधूला ताबडतोब रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी करून, ती गर्भवती असल्याचे सांगितले. हे कळताच पती मुलगा भडकला. काही वेळानंतर संबंधित वधूने एका मुलाला जन्म दिला. यानंतर, वर मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी ताबडतोब मुलीच्या कुटुंबियांना फोन करून बोलावले आणि तिला मुलासह परत पाठवले.
ही घटना करछना भागातील एका गावाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न २४ फेब्रुवारी रोजी झाले होते. लग्नाचे सर्व विधीही मोठ्या उत्साहात पार पडले होते आणि मुलगा वधूला घेऊन आपल्या घरी आला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात, २५ फेब्रुवारी रोजी नवविवाहितेच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या.
घरातील लोकांनी काही घरगुती उपायही करून बघितले. मात्र, त्याचा काहीही परिणाम न झाल्याने, त्यांनी रात्री उशिरा तिला सीएचसी करछना येथे नेले. घटना घडली तेव्हा अनेक नातलग घरीच होते.
डॉक्टरांनी संबंधित महिलेची तपासणी केली असता, तिच्या पोटात नऊ महिन्यांचे बाळ असल्याचे समोर आले. तसेच काही वेळातच संबंधित महिला बाळाला जन्म देईल, हे ऐकताच सासरच्या लोकांना धक्का बसला.
याशिवाय, संबंधित सर्व प्रकार समोर आल्यानंतर संबंधित नवरा मुलगाही भडकला. त्याने तत्काळ आपल्या सासरच्या लोकांना फोन करून बोलावून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला नवविवाहित वधूला नवजात बाळासह तिच्या पालकांसोबत घरी पाठवण्यात आले.
आजही गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. सध्या कोणत्याही पक्षाने पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही.
गेल्या वर्षाच्या मे महिन्यातच ठरलं होतं लग्न - लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूने मुलगाला जन्म दिल्यावरून वधू आणि वर य दोहोंच्याही घरात गोंधळ उडाला आहे. संबंधित मूल हे वराचेच असल्याचे वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. एवढेच नाही, तर हे लग्न मे २०२४ मध्येच ठरले होते. तेव्हापासून वधू आणि वर अनेकदा एकमेकांना भेटले, असेही वधूच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
...मात्र, मुलाने याला नकार दला आहे. तसेच आपण सुन म्हणून संबंधित नववधूचा स्वीकार करणार नाही, असे वराच्या वडिलांनी म्हटले आहे. याप्रकरणी पंचायतही झाली, मात्र, कोणताही निर्णय लागला नाही.