मुझफ्फरनगर येथे उत्कल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 19:57 IST2017-08-22T19:51:11+5:302017-08-22T19:57:01+5:30

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर जिल्ह्यात खतौलीजवळ झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंत 24 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
खतौलीजवळ झालेल्या रेल्वे अपघातात 150 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी 5.44 च्या सुमारास हरिद्वारला जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे खतौलीजवळ घसरले.
या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना साडेतीन लाख, जखमींना पन्नास हजार रुपये, तर किरकोळ जखमींना 25 हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे.