Unlock: उद्यापासून लस घेतलेल्यांनाच मॉल्स, बार, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश; 'या' राज्यांनी निर्बंध हटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:20 PM2021-07-11T16:20:52+5:302021-07-11T16:33:06+5:30

Lockdown News: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील.

Unlock Guidelines Latest News: कोरोनाची रौद्र झालेली दुसरी लाट ओसरू लागल्याने विविध राज्यांनी अनलॉक करण्याचा वेग वाढविला आहे. सोमवारपासून ही राज्ये प्रतिबंध ढीले करू लागली आहेत. केंद्राने तरीदेखील राज्यांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील.

उत्‍तर प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यूचा वेळ बदलण्यात आला आहे. उद्यापासून हा वेळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. आधी तो सायंकाळी ७ ते सकाळी ७ असा होता. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील बाजारपेठा उघडण्यात येणार आहेत.

राजस्थानमध्ये विकेंड कर्फ्यू हटविण्यात आला आहे. सिनेमागृहे, ट्रेनिंग सेंटर्स, पर्यटन स्थळे, लग्न समारंभ आदींना परवानगी देण्यात आली आहे. राज्या बाहेरील पर्यटकांनी लसीचा एक डोस घेतला असेल तर त्यांना बिनदिक्कत फिरता येणार आहे.

पंजाब सरकारने देखील विकेंड बॅन आणि नाईट कर्फ्यू हटविला आहे. घरगुती कार्यक्रमांना 100 लोक आणि बाहेर कार्यक्रमांना 200 लोक एकत्र येऊ शकतात. लस घेतलेल्यांना बार, रेस्टॉरंट, स्पा, स्विमिंग पुल, मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

दिल्ली सरकारने शाळा उघडण्याची तयारी सुरु केली आहे. सोमवारपासून शाळांच्या ऑडिटोरिअम किंवा असेम्ब्ली हॉलमध्ये ट्रेनिंगसाठी उघडता येणार आहेत. सध्या विद्यार्थी येऊ शकणार नाहीत. सिनेमा गृहे उघडणार नाहीत. मेट्रो, बसमध्ये ५० टक्के प्रवासी.

Unlock in Maharashtra: महाराष्ट्रात लेव्हल ३ चे निर्बंध लागू राहणार आहेत. साताऱ्यासारखे जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले होते. पुण्यातही जुन्या गाईडलाईन सुरु राहतील. सर्व दुकाने, व्यवसाय ४ वाजता बंद करावे लागणार आहेत.

कर्नाटकमध्ये अनलॉक केले जात आहे. सार्वजनिक बस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पाँडिचेरीमध्ये १६ जुलैपासून ९ ते १२ वीच्या शाळा उघडणार आहेत. कॉलेजदेखील सुरु होणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये उद्यापासून लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्यात आले आहे. केरळमध्ये शबरीमाला मंदिर 17 ते 21 जुलै उघ़डणार आहे. लस घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश आहे.

ओडिशामध्ये आंशिक लॉकडाऊन 16 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. रथयात्रा पाहता पुरीमध्ये अतिरिक्त कर्फ्यू लागू आहे. पश्चिम बंगाल सरकारने 15 जुलैपर्यंत निर्बंध वाढविले आहेत. पुढील निर्णय येत्या दोन तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले तरी देखील लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.

Read in English