Today Gold Rate: सोन्याचा भाव वाढला; चांदीची किंमतीतही झाली वाढ, जाणून घ्या, आजचा दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 01:10 PM2022-01-23T13:10:07+5:302022-01-23T14:03:05+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मौल्यवान धातूंच्या मूल्यामध्ये वाढ झाल्याच्या परिणामी देशांतर्गत मूल्यामध्ये वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५३० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.