हे आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:17 IST2017-09-03T16:08:50+5:302017-09-03T16:17:11+5:30

शिव प्रताप शुक्ला उत्तरप्रदेशातील राज्यसभा खासदार आहेत. ते ग्रामविकास संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत.
अश्विनी कुमार चौबे हे बिहारमधील बक्सर, लोकसभा खासदार आहेत. ते ऊर्जा आणि स्थायी समितीवर संसदीय समितीचे सदस्य आहेत.
वीरेंद्र कुमार हे टिकमगढ, मध्य प्रदेशचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी एमए पी.एचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत.
अनंतकुमार हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. ते परराष्ट्र व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.
माजी सनदी अधिकारी आरके सिंह हे बिहारमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.
हरिदिप सिंग पुरी 1 9 74 च्या तुकडीचे माजी आयएफएस अधिकारी आहेत, ते ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचे वडिलही मुत्सद्दी होते.
गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर लोकसभा खासदार, राजस्थान ते अर्थसंकल्प संसदीय स्थायी समितीचे सदस्य आणि फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष आहेत.
सत्यपाल सिंह 1980 च्या बँचचे, महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ते बागपत येथून लोकसभेत गेले आहेत.
अल्फोन्स कन्ननथनम कोट्टयमचे असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, डिमाँलिशन मँन नावाने ओळखले जाते.