भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:04 IST2025-09-11T15:54:47+5:302025-09-11T16:04:18+5:30
भारतात एक असं राज्य आहे, जिथे बहुतांश लोक नेपाळचेच आहे. या राज्यात जवळपास ७० टक्के नेपाळी लोक राहतात.

नेपाळ हा भारताचा अगदी शेजारी देश आहे. या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाचीही गरज लागत नाही. मात्र, सध्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या जेन झी आंदोलनामुळे भारताने नेपाळच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे.
मात्र, भारतात एक असं राज्य आहे, जिथे बहुतांश लोक नेपाळचेच आहे. या राज्यात जवळपास ७० टक्के नेपाळी लोक राहतात. इतकंच नाही तर, या राज्याचे सरकार या लोकांना आरक्षणाचा लाभही देतं.
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचे संबंध फार जुने आहेत. देश केवळ सीमेनेच जवळ नाही, तर या दोन्ही देशातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक नातेसंबंध देखील दृढ आहेत. या दोन्ही देशांमध्ये अगदी 'रोटी-बेटी' व्यवहाराइतके जवळचे संबंध आहेत.
भारतातील उत्तर पूर्वेला वसलेले एक सुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. इथलं निसर्ग सौंदर्य पाहायला हजारो पर्यटक सिक्कीममध्ये फिरण्यासाठी येत असतात. डोंगर-दऱ्यांनी वेढलेलं हे राज्य नेपाळपासून फार जवळ आहे.
नेपाळची सीमा सिक्कीमला लागून असल्यामुळे, नेपाळी समुदायातील लोक मोठ्या संख्येने या राज्यात स्थायिक झाले आहेत.
सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात नेपाळी लोक राहतात. सिक्कीमची ७० टक्के लोकसंख्या ही नेपाळी आहे. नेपाळी लोकांसोबतच सिक्कीममध्ये २७ टक्के लोक लेप्चा आणि भूटिया समाजाचे आहेत.
नेपाळमधील बहुतेक लोक हिंदू धर्माचे पालन करतात, तर लेप्चा आणि भुटिया बौद्ध धर्माचे पालन करतात. सिक्कीमची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली नेपाळच्या प्रभावाखाली आहे. येथील लोक हिंदू आणि बौद्ध धर्माचे पालन करतात, जे नेपाळच्या सांस्कृतिक रचनेशी मिळते-जुळते आहे.
भारत आणि नेपाळमधील १,८५० किमी लांबीच्या सामायिक सीमेमध्ये सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.