देशातील 'या' राज्यात उगवतो पहिल्यांदा सूर्य, रात्री 3 वाजताच पडतात किरणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:02 PM2019-07-31T16:02:07+5:302019-07-31T16:08:42+5:30

सूर्याला नमस्कार केल्याशिवाय सकाळच उजाडत नाही. सूर्योदयाचं दृश्य तर विलोभनीय असंच असतं.

लाल आणि पिवळ्या आकाशासोबत जेव्हा सूर्याची चमकदार किरणे जमिनीवर पडतात, तेव्हा स्वर्गाची अनुभूती येते. देशात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो.

या प्रदेशाच्या नावातूनच हे स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी मानलं जातं. या प्रदेशातील लहान ठिकाण डोंग व्हॅलीमध्ये सर्वातआधी सूर्य उगवताना पाहिला जाऊ शकतो.

सूर्याचा प्रकाश आणि किरणांची लाल रंगाची चादर डोंग व्हॅलीमध्ये रात्री 3 वाजल्यापासून बघायला मिळते. लोहित नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

1999मध्ये या गोष्टीचा शोध लावण्यात आला होता की, भारतात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग व्हॅलीमध्ये होतो.

चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि निळ्या आकाशावर पसरलेल्या सूर्यांच्या रंगात रंगलेले लाल-पिवळे ढग डोळे दिपवणारा नजारा असतो.