Solar Eclipse 2020 : आकाशात 'रिंग ऑफ फायर', भारतासह संपूर्ण जगात 'असा' दिसला सूर्याचा 'नजारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 04:03 PM2020-06-21T16:03:42+5:302020-06-21T16:22:00+5:30

वर्षाचं पहिलं सुर्यग्रहण लागलं आणि आकाशात सुर्याची सुंदर प्रतिमा दिसायला सुरूवात झाली. भारतासह जगभरातील लोक हा नजारा पाहण्यासाठी उत्सुक होते. काही ठिकाणी पावसाच्या वातावरणामुळे ढग जमा झाल्याने सुर्यग्रहण पाहता आले नाही. आम्ही तुम्हाला सुर्यग्रहणाचे निवडक फोटो दाखवणार आहोत.

सुर्यग्रहणाचं हे सुंदर छायाचित्र दिल्लीतील नोएडा परिसरातून टिपण्यात आलं आहे.

उत्तराखंडमधील डेहरादून परिसरातील लोकांना सुर्यग्रहणांचा अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. यावेळी सुर्याचा प्रकाश चंद्राच्या सावलीवर दिसून आला. एका सोनेरी रिंग प्रमाणे आकाशात दृश्य दिसत होते.

हे छायाचित्र पंजाबमधील अमृतसरमधून टिपण्यात आला आहे. आकाशात गुलाबी रंग या ठिकाणी दिसून आला.

राजधानी दिल्लीतून सुर्यग्रहणाची ही अद्भूत छायाचित्र समोर येत आहेत. दिल्लीमध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे फारशी चमक दिसून आली नाही.

हरियाणातील कुरुक्षेत्र येथून हे दृश्य टिपण्यात आले आहे.

जयपूरच्या राजस्थानमधील हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. १ वाजून ४४ मिनिटांनी जयपूरमध्ये हे ग्रहण दिसून आले.

भारताशिवाय पाकिस्तानाही सुर्यग्रहण दिसून आले. रिंग ऑफ फायरचे फोटो पाकिस्तानातील कराचीमध्ये टिपण्यात आली आहेत.

भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळमध्येही हे ग्रहण दिसून आले. हा आले फोटो काठमांडूमधून टिपण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि नेपाळसह युएसएमध्येही हे ग्रहण दिसून आले.