शिवसेनेमधून झाली होती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 18:56 IST2017-08-23T18:50:43+5:302017-08-23T18:56:53+5:30

सध्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकीय कारकीर्दीला शिवसेनेपासून सुरुवात झाली. 1996 साली ते सर्वप्रथम शिवसेनेच्या तिकीटावर राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून लोकसभेवर गेले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरेश प्रभू यांनी महत्वाच्या खात्याची मंत्रिपदे भूषवली. ते चारवेळा लोकसभेवर निवडून गेले.

9 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.

मागच्या आठवडयाभरात कैफीयत आणि उत्कल या दोन एक्सप्रेसचे अपघात झाल्याने सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सादर केला आहे.

टॅग्स :अपघातAccident