सचिन तेंडुलकरची मुलांसोबत मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 14:05 IST2017-11-21T13:59:51+5:302017-11-21T14:05:53+5:30

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी काही विशेष मुलांसोबत वेळ घालवला.

युनिसेफचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणा-या सचिनने बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलांसोबत फक्त वेळ घालवला नाही, तर क्रिकेटही खेळला.

सचिन यावेळी मुलांसोबत 5-5 ओव्हरचा सामनाही खेळला.

यावेळी सचिनने फलंदाजी करत तीन चौकेही लगावले. चॅरिटी सामना असतानाही सचिन मात्र मुलांसोबत मन लावून खेळताना दिसला.

सचिनने मुलांना बॅटिंग आणि बॉलिंगसाठी काही टिप्सही दिल्या. मास्टर ब्लास्टरकडून प्रशिक्षण मिळतंय हे पाहून मुलंही आनंदात होती.

यावेळी सचिनने मुलांसोबत अनेक आठवणी शेअर केल्या. आपण लहान असताना क्रिकेटमुळे खूप प्रवास करायला लागायचा. सुरुवातील आई - वडिलांसोबत जायचो पण नंतर एकट्याने प्रवास करु लागलो असं सचिनने सांगितलं.

पालकांकडून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळाल्याने मला यश मिळालं असं सचिनने मुलांना सांगितलं.

आपण लहानपणी खूप खोडकर होतो, पण लक्ष्य मिळवण्यासाठी आपण ते सर्व सोडलं आणि शिस्तबद्द झालो असंही सचिनने सांगितलं.

मुलांनी मास्टर ब्लास्टरसोबत सेल्फी काढत आठवण जपून ठेवली.