पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेला ६ वर्षातच धक्का; देशात १६८० कोटी नोटा गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:10 PM2022-09-27T14:10:03+5:302022-09-27T14:13:47+5:30

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयानं देशातील कमीतकमी ३-४ लाख कोटी काळा पैसा बाहेर येईल असा विश्वास केंद्र सरकारला होता. मात्र प्रत्यक्षात १.३ लाख कोटी काळा पैसा बाहेर आला. परंतु नोटाबंदीच्या वेळी जाहीर झालेल्या नवीन ५०० आणि २००० नोटांमध्ये आता ९.२१ लाख कोटी गायब झाल्याचं उघड झालं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या २०१६-१७ पासून ताज्या २०२१-२२ च्या वार्षिक अहवालात असं दिसून आलं आहे की, आरबीआयने २०१६ पासून आतापर्यंत ५०० आणि २००० च्या एकूण ६८४९ कोटी नोटा छापल्या होत्या. त्यापैकी १६८० कोटी पेक्षा जास्त नोटा चलनातून गायब झाल्या आहेत.

या गायब झालेल्या नोटांचे मूल्य ९.२१ लाख कोटी रुपये आहे. या गायब नोटांमध्ये आरबीआयनं खराब झाल्यानंतर नष्ट झालेल्या नोटांचा समावेश नाही. कायद्यानुसार कर भरला नाही अशा कोणत्याही रकमेला काळा पैसा मानला जातो. ९.२१ लाख कोटी रुपयांमध्ये लोकांच्या घरात जमा केलेल्या बचतीचा समावेश असू शकतो.

परंतु उत्तर प्रदेशच्या निवडणुकांदरम्यान, अत्तराच्या व्यावसायिकावरील छाप्यांपासून पश्चिम बंगाल मंत्री पार्थ चटर्जी यांच्या छाप्यांपर्यंतच्या ९५% पेक्षा जास्त काळ्या पैसा जमा झाला आहे. RBI अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केले की, गायब पैशांमध्ये सगळाच काळा पैसा मानला जाऊ शकत नाही, परंतु या रकमेचा मोठा भाग काळ्या पैशाचा आहे.

अधिकाऱ्यांना वाटतं की, काळ्या पैसा जमा करण्यात सर्वाधिक वापर ५०० आणि २००० च्या नोटांचा असतो. कदाचित म्हणूनच २०१९ पासून २ हजारच्या नोटा छपाई करण्यात बंद करण्यात आले. परंतु २०१६ च्या तुलनेत ५०० च्या नवीन डिझाइन नोट्सचे मुद्रण ७६% वाढले आहे. घरात जमा केलेली अशी रोकड एकूण काळ्या पैशाच्या केवळ २-३% आहे असं तज्ज्ञांना वाटतं.

अशा परिस्थितीत, स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांच्या काळ्या पैशावर २०१८च्या अहवालामुळे अशी शक्यता आहे की, गायब ९.२१ लाख कोटींची रक्कम काळ्या पैशाची असावी. या अहवालानुसार स्विस बँकांमधील भारतीयांचे काळे पैसे ३०० लाख कोटी आहेत. या रकमेपैकी ३ टक्के फक्त ९ लाख कोटी रुपये आहेत.

२०१६ मध्ये अचानक घेण्यात आलेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. एटीएममधून कमी प्रमाणात निघत असलेले पैसे आणि बँकांसमोरील लांबच लांब रांगा यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले होते. तेव्हा मोदींनी केवळ ५० दिवस कळ सोसा, नोटबंदीमुळे सध्या त्रास होत असला, तरी त्यातून देशाला मोठा फायदा होईल, असा दावा केला होता.

५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर कुणी बँक खात्यात पैसे जमा करून काळ्या पैशाचे पांढरे करू इच्छीत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. असा इशाराही पंतप्रधानांनी दिला होता. ५० दिवसांनंतर माझा हा निर्णय चुकीचा वाटल्यास मी शिक्षा भोगण्यास तयार आहे असंही भावनिक आवाहन मोदींनी लोकांना केले होते.

कसा असतो नोटांचा प्रवास? - बँकेतून लोकांना पैसे मिळाल्यानंतर ५०० आणि २ हजारांच्या नोटा सामान्यत: ५-७ वर्ष चालतात. सर्कुलेशनमुळे कुठलीही नोट फाटली किंवा खराब झाली तर तिला आरबीआयकडे परत पाठवली जाते. ही नोट रिइश्यू करायची की नष्ट करायची हा निर्णय आरबीआय घेते. छापलेल्या नोटा आणि रद्द केलेल्या नोटा यातील जमा नोटा बाजारात चलनात असायला हव्यात. या नोटा चलनात नसतील तर त्याचा अर्थ बँकिंग सिस्टीममध्ये या नोटा गायब झाल्या आहेत.

RBI नुसार, २०१६ पासून २०१८ पर्यंत ५०० च्या २३०० कोटी नोटा नष्ट केल्या. सुरुवातीच्या २ वर्षात २००० नोटा नष्ट करण्याची गरज भासली नाही. मागील ६ वर्षात २ हजाराच्या ३७० कोटी छापण्यात आल्या. तर १०२ कोटी नोटा नष्ट केल्या. २६८ कोटी नोटा सध्या व्यवहारात असायला हव्यात. मात्र ५४ कोटी नोटा चलनातून गायब आहेत त्याची किंमत १.०८ लाख कोटी इतकी आहे. तर ५०० च्या १६२६ कोटी नोटा गायब आहेत. ज्याची किंमत ८.१३ लाख कोटी आहे.