फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:08 IST2025-12-30T12:32:29+5:302025-12-30T13:08:27+5:30

Raihan Vadra And Aviva Baig : प्रियंका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा झाला आहे.

गांधी-वाड्रा कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा झाला आहे.

साखरपुड्याने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान वाड्राने आपली सात वर्षांपासूनची मैत्रीण आणि गर्लफ्रेंड अवीवा बेग हिला प्रपोज केलं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर हा साखरपुडा पार पडला.

अवीवा बेग ही दिल्लीची रहिवासी असून तिचं कुटुंब  प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा कुटुंबाच्या अत्यंत जवळचं मानलं जातं.

अवीवाचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित मॉडर्न स्कूलमधून झाले असून, त्यानंतर तिने 'ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी'मधून मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदवी संपादन केली आहे.

अवीवा बेग केवळ एका नावाजलेल्या कुटुंबातीलच नाही, तर तिने स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.

अवीवा एक फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर आहे. तिने काढलेले फोटो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोर्टल्स तसेच प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

गेल्या काही वर्षांत तिने 'यू कॅनॉट मिस दिस' (इंडिया आर्ट फेअर, २०२३) आणि 'द इल्युजरी वर्ल्ड' (२०१९) सारख्या अनेक यशस्वी प्रदर्शनांमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण केलं आहे.

फोटोग्राफीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणं आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं हे अवीवाचं मुख्य उद्दिष्ट आहे.

अवीवा बेगच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक मनोरंजक पैलू आहेत. ती राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू राहिली आहे. निसर्गाची आवड असल्यामुळे ती अनेकदा कॅमेरा घेऊन जंगल, डोंगर आणि वाळवंटांची सफर करते.

रेहान आणि अवीवा दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. रेहान अनेकदा आपली आई प्रियंका गांधी यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसतो, तर अवीवा तिच्या क्रिएटिव्ह क्षेत्रात सक्रिय आहे.