राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 01:00 PM2019-04-19T13:00:31+5:302019-04-19T13:08:30+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचे नाव मतदार वगळण्यात आले आहे. त्यामुळे तो यंदा मतदान करू शकणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे वकिल ऋषिकेश यादव यांनी 14 एप्रिल रोजी राहुल द्रविडच्या मतदानासंदर्भातील छापलेली बातमी शेअर केली. तसेच दुर्दैवाने निवडणूक आयोगाने त्यांनाच ब्रँड अॅम्बेसिडर बनवले होते, असेही ट्विटमध्ये म्हटले.

संगीतकार विशाल ददलानी यांनीही ट्विट करुन निवडणूक आयोगाकडे बोट दर्शवले, मला वाटतं येथे 2019 ची संपूर्ण निवडणूकच दिसत आहे, असे दललानी यांनी लिहिलं आहे.

याबाबत दिल्ली सरकारचे स्थायी समितीचे सदस्य राहुल मेहरा यांनीही ददलानी यांचे ट्विट रिट्विट करुन, काय हे चाललंय हे ? असा प्रश्न विचारला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटरवरुन प्रश्न विचारला आहे. आपण भयमुक्त आणि स्वतंत्र निवडणुकांची अपेक्षा करायची तरी कशी ? असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला आहे.

इलेक्टोरल ऑफिसर संजीव कुमार यांनी राहुल द्रविडची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. विशेष म्हणजे राहुल यांचे भाऊ विजय यांनीच राहुल आणि त्यांच्या पत्नीचे नाव हटविण्यासाठी 7 नंबरचा फॉर्म भरुन दिला होता.

राहुल आणि त्यांच्या पत्नीचे नाव हटविल्यानंतर नवीन ठिकाणी नाव टाकण्यासाठी 6 नंबरचा फॉर्मही घेतला. पण, तो जमा केल्यामुळे राहुल यांचे नाव यादीत आलंच नाही. 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यान द्रविडने आपले घर बदलले आणि त्यामुळे त्याने इंदिरानगर मतदारसंघातून आपले नाव कमी केले. नवीन मतदारसंघात त्याला नाव नोंदवता आले नाही.