पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्प यांना दिलं स्पेशल 'गिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 02:58 PM2017-11-29T14:58:00+5:302017-11-29T14:59:56+5:30

जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी भारत दौ-यावर आलेल्या इवांका ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सुंदर लाकडी पेटी भेट स्वरुपात दिली आहे. ही पेटी सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे.

सॅडली हे गुजरातमधील हस्तकलेचे उत्तम उदहारण आहे. हैदराबाद भेटीची आठवण म्हणून इवांका ट्रम्प यांना ही सुंदर भेटवस्तू देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अन्य देशातल्या मोठया नेत्यांना भेटतात तेव्हा ते आवर्जून भारतीय संस्कृती, परंपरेशी संबंधित खास वस्तू भेट म्हणून देतात.