शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदींच्या बांग्लादेश आंदोलनातील सहभागावर प्रकाश आंबेडकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 3:48 PM

1 / 10
'बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं.
2 / 10
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते.
3 / 10
बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे, असेही मोदींनी बांग्लादेश दौऱ्यात म्हटले आहे.
4 / 10
मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. या विधानावरुन अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत. यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
5 / 10
'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात,' असा सवाल ओवेसी यांनी केला.
6 / 10
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनीही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांनी मोदीजी अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे.
7 / 10
'अजून किती फेकणार मोदीजी, हद्द झाली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
8 / 10
आता, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. मी लहान होतो त्यामुळे सांगता येणार नाही मोदींनी बांग्लादेश निर्मितीवेळी आंदोलनात भाग घेतला का नाही, असे आंबडेकर यांनी म्हटलं.
9 / 10
परमबीर सिंग टेलरबॉम्बप्रकरणावरही आंबेडकर यांनी भाष्य केलंय. सगळी परिस्थिती पाहता निष्पक्ष चौकशी होण्यासाठी राज्य सरकार बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे. सभागृह बरखास्त करण्याची गरज नाही, कारण गुन्हा सरकारचा आहे, इतर आमदारांनी काही गुन्हा केलेला नाही.
10 / 10
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या NIAला आमचे आवाहन आहे की त्यांनी वाझेंचे कबुलीजबाब सार्वजनिक करावे, जेणेकरून जनतेलाही निर्णय घेता यावा. तसे केले तर बऱ्याच गोष्टी लोकांना समजतील, असेही आंबेडकर म्हणाले.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश