भारताच्या पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास ‘सुपर प्लेन’ उड्डाणासाठी सज्ज; कसं असेल सुरक्षा कवच?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:53 PM2020-06-03T12:53:42+5:302020-06-09T14:25:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा आता जमिनीसोबत हवेतही अभेद्य होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सुपरेजट एयर इंडिया वन अमेरिकेत बनून तयार झालं आहे. या महिन्यात एअर इंडिया वन भारताला सुपूर्द करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुपट जेटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या सुरक्षेची उपाययोजना केली आहे. म्हणजे एकप्रकारे हवेत उडणारा अभेद्य किल्ला असल्याचं दिसून येईल.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना घेऊन जाण्यासाठी एअर इंडियाने नवीन बोईंग ७७७-३०० विमान खरेदी केले होते, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या विमानात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारताने या स्वदेशी विमानासाठी अमेरिकेसोबत १३०० कोटींचा करार केला होता.

या करारातंर्गत दोन सेल्फ प्रोटेक्शन सूट खरेदी करण्यात आले आहेत, हे सूट एअर इंडिया वन विमानात बसवण्यात येणार आहे, दोन पैकी एक विमान बनून तयार झालं आहे, त्याची चाचणी केली जात आहे.

या विमानाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत, पंतप्रधानांचे हे विमान अत्याधुनिक मिसाइल डिफेंस सिस्टिमसारखे आहे. यात लावलेले खास सेंसर मिसाइल हल्ल्याची माहितीची तात्काळ सूचना देईल. यानंतर डिफेन्सिव्ह वॉरफेयर सिस्टम एक्टिव्ह होईल.

या डिफेन्स सिस्टममध्ये इंफ्रा रेड सिस्टम, डिजिटल रेडियो फ्रिक्वेंसी जॅमर लावण्यात आले आहे. ही सुविधा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या विमानातही लावण्यात आली आहे. पण ट्रम्प यांचे विमान अनेक बाबींमध्ये एअर इंडिया वन पेक्षा सरस आहे.

२६ वर्षापासून पंतप्रधानांसाठी विशेष विमान म्हणून सेवा देणाऱ्या एअर इंडिया वनची जागा बोईंग ७७७ या महिन्यात घेईल. बोईंगने दोन ७७७-३०० इआर विमान जानेवारी महिन्यात घेतले आहेत. दोन्ही विमानांना अत्याधुनिक सुरक्षा देण्यासाठी अमेरिकेत पाठवलं होतं.

अमेरिकेच्या डॅलस राज्य, फोर्ट वर्थमधील या विमानांमध्ये आता प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यात क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा जोडण्याचा सौदा केल्याचे सांगण्यात येत आहे. ही विमाने आल्यानंतर पंतप्रधान अधिक सुरक्षित आणि आरामात प्रवास करू शकतील.

एअरफोर्स वन हे अमेरिकन राष्ट्रपती विमान आहे. ताशी १.०१३ किलोमीटर वेगाने ३५ हजार फूट उंचीवरुन उड्डाण घेऊ शकते, हे विमान एका वेळी ६ हजार ८०० मैल अंतर व्यापू शकते. हे विमान जास्तीत जास्त ४५ हजार १०० फूट उंचीवर उडू शकते.

या विमानाच्या एका उड्डाणासाठी प्रति तास १ लाख ८१ हजार डॉलर्स (सुमारे १ कोटी ३० लाख रुपये) खर्च येतो, तर पीएम मोदी यांचे नवीन विमान सुमारे ९०० किमी प्रतितास वेगाने उड्डाण करते.