दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:22 IST2025-04-30T16:15:33+5:302025-04-30T16:22:12+5:30
Pahalgam Terror Atack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराकडून कधीही कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर भारत सरकारही बैठकांवर बैठका घेऊन पुढील रणनीती आखत आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने पाकिस्तान सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानमधील कोणकोणत्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतो, याबाबत अंदाज वर्तवला जात.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराकडून कधीही कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर भारत सरकारही बैठकांवर बैठका घेऊन पुढील रणनीती आखत आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने पाकिस्तान सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानमधील कोणकोणत्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतो, याबाबत अंदाज वर्तवला जात.
भारताने पाकिस्तानवर मर्यादित हल्ले करण्याचा विचार केला, तर त्या कारवाईदरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि अड्डे हे मुख्यत्वेकरून हिटलिस्टवर राहणार आहेत. त्यात दहशकवाद्यांच्या अड्ड्यांसह, पीओकेमधील लॉन्च पॅड आणि पाकिस्तानमधील काही लष्करी केंद्रांचाही समावेश असेल.
भारताने हल्ला केल्यास ज्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं जाईल, त्यामध्ये पहिलं नाव हे २००८ मध्ये झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड हाफिस सईद याचं असेल. हाफिज सईद याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा अड्डा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरिदके येथे आहे. या अड्ड्याला भारत लक्ष्य करू शकतो, अशी पाकिस्तानला भीती आहे.
काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले करणारी संघटना जैश ए मोहम्मद ही सुद्धा भारतीय लष्कराच्या टार्गेटवर असेल. जैश ए मोहम्मदचे अड्डे मुख्यत्वेकरून पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील बहावलपूर येथे आहेत. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट, मुझफ्फराबाद आणि कोटली येथे जैशचे लॉन्चपॅड आणि प्रशिक्षण केंद्रं आहेत.
भारतीय लष्कराच्या हिटलिस्टवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर हेही असू शकतात. मुनीर यांच्या चिथावणीमुळेच पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. मुनीर हे २०२२ पासून या पदावर आहेत. दरम्यान, मुनीर हे आयएसआयचे प्रमुख असतानाच पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय हे रावळपिंडी येथे आहे. येथूनच पाकिस्तानी लष्कर आणि सैन्याची सुत्रे हलवली जातात.
सध्याच्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे १७ ट्रेनिंग कॅम्प आणि ३७ लॉन्च पॅड सक्रिय आहेत. त्यांचं संचालन लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आमि इतर दहशतवादी संघटनांकडून केलं जातं. येथूनच दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी सच्च केलं जातं. हे लॉन्च पॅड मुख्यत्वेकरून मुझफ्फराबाद, रावलकोट, बाग आणि कोटली परिसरात आहेत.
याशिवाय भारतीय सैन्याकडून थेट कारवाई झाल्यास पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसुद्धा निशाण्यावर असेल. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे आयएसआयचा हात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. तसेच हीच संघटना लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करत असते. आयएसआयचं मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे. हल्ला झाल्यास तेही लष्कराच्या निशाण्यावर असेल.