नाद खुळा मुख्यमंत्री... गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणार रेशनचं धान्य, 9,260 माबाईल व्हॅनचं लोकार्पण

By महेश गलांडे | Published: January 21, 2021 12:44 PM2021-01-21T12:44:39+5:302021-01-21T13:30:22+5:30

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात घर केलंय. आशा वर्करसाठी घेतलेला निर्णय असेल किंवा मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार असेल, त्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुकच झालंय.

जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी नवीन वाहनांचा शुभारंभ केला. विजयवाडा बेंज सर्कलमध्ये कृष्ण गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यासाठी 2500 रेशन वाहनांना ग्रीन सिग्नल दिला.

जगनमोहन यांच्यासमवेत राज्यातील इतर जिल्ह्यांत विविध मंत्र्यांच्या हस्ते या डिलिव्हरी वाहनांचे लोकापर्ण करण्यात आले. राज्यात तब्बल 9260 वाहनांचे लोकार्पण करण्यात आलंय.

1 फेब्रुवारीपासून आंध्र प्रदेशमधील जनतेला उत्तम दर्जाच्या तांदळाचे घरपोच वितरण होणार आहे, विशेष म्हणजे हे तांदुळ रेशन कार्डधारकांना घरपोच मिळणार आहेत.

जगनमोहन रेड्डी सरकारच्या या घरपो रेशन योजनेसाठी 830 कोटी रुपये अतिरिक्त निधी पुरवठा करण्यात आला आहे.

प्रजा संकल्प पदयात्रेदरम्यान, जगनमोहन यांनी वृद्ध, गरिब, मजूर आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना पाहून व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडविण्याचं आश्वासन जगनमोहन यांनी दिलं होतं.

सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून सोना मसुरी या उत्तम दर्जाचा तांदुळ रेशन धान्याचा पुरवठा म्हणून कार्डधारकांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे.

रेशन दुकानातील काळाबाजार दूर व्हावा आणि कामातून वेळ मिळत नसल्यानं किंवा दुकानदार दुकानं बंद ठेवत असल्यानं कार्डधारकांची गैरसोय होत होती. त्यामुळे, लोकांची सोय व्हावी, याच उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

गरिबांना आता रेशन दुकानात जायची, रांगेत उभी राहायची गरज भासणार नसून दारापर्यंत-घरापर्यंत रेशनचं धान्य वितरीत केलं जाणार आहे.

जगनमोहन यांनी 9260 गाड्यांचे अनावरण केल्यानंतर नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे देशात अशाप्रकारे रेशनपुरवठ्याचा हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे

जनतेच्या मनातला नेता म्हणून जगनमोहन लोकप्रिय होत आहेत, चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत जगन यांनी आंध्र प्रदेशात स्वत:चं स्थान निर्माण केलंय.

मोबाईल व्हॅनच्या रांगाच रांगा अनेक जिल्ह्यात पाहायला मिळाल्या, याच मोबाईल व्हॅन आता 1 फेब्रुवारीपासून लोकांंच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत.

या मोबाईल व्हॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा असन सोलर प्रणालीवर धावणार आहेत.

जगनमोहन यांनी स्वत: गाडीत जाऊन वजनकाटा आणि वितरणप्रणालीची माहिती घेतली.

आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णयाची आणि योजनेची देशातील विविध राज्यांनी दखल घेतल्यास गरिबांसाठी हे क्रांतीकारी पाऊल ठरेल.