शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nirbhaya Case: बलात्कारातील अल्पवयीन आरोपी ज्याचा चेहराही कोणी पाहिला नाही; तो सध्या ‘असं’ जीवन जगतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 3:01 PM

1 / 10
निर्भया सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सहा आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन होता. घटनेच्या काही महिन्यांनंतर तो 18 वर्षांचा होणार होता. कोर्टाने असा निर्णय दिला की सध्याच्या कायद्याच्या आधारे त्याला अल्पवयीन म्हणून शिक्षा सुनावण्याऐवजी सुधारगृहात पाठवावे. निर्भयाच्या दोषींमध्ये हा एकमेव चेहरा आहे जो आजपर्यंत देशाने पाहिला नाही
2 / 10
या प्रकरणात दोषी आढळलेला अल्पवयीन आरोपी सध्या बाहेर फिरतोय, परंतु आज तो कुठे आहे काय करतोय हे काही जणांनाच माहिती आहे. काही दिवस सुधारगृहात राहिल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची सुटका झाली.
3 / 10
निर्भया प्रकरणात शिक्षा झालेला अल्पवयीन हा दक्षिण भारतात स्वयंपाकाचे काम करत आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तो नव्या स्वरूपात जीवन जगत आहे, त्याने नवीन नावही घेतले आहे. त्याने दिल्लीतील निरीक्षण हॉलमध्ये स्वयंपाक शिकला होता.
4 / 10
त्या अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही त्याला राष्ट्रीय राजधानीपासून बरेच दूर पाठविले जेणेकरुन लोक त्याला शोधू शकणार नाहीत, तो नवीन जीवन जगत आहे. दक्षिण भारतात एक स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. त्याला ज्याने कामावर ठेवले आहे त्याला त्याचं खरं नाव आणि इतिहास माहिती नाही.
5 / 10
अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवत आहोत जेणेकरून तो कोणाच्याही डोळ्यासमोर येऊ नये. घटनेच्या वेळी सामूहिक बलात्कारात सामील झालेला हा अल्पवयीन आरोपी होता. वृत्तानुसार, या अल्पवयीन आरोपीनेच सर्वात जास्त क्रूरता केली.
6 / 10
स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन होता आणि तो बस चालक रामसिंगसाठी काम करत होता.
7 / 10
त्याची रामसिंह याच्याकडे ८००० रुपयांची थकबाकी होती. रामसिंहांकडून तो सतत पैसे मागत होता. घटनेच्या रात्री तो रामसिंहकडे आपले पैसे घेण्यासाठी गेला होता आणि तो गुन्ह्यात आरोपी बनला
8 / 10
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषींना अखेर फासावल लटकवले. या शिक्षेनंतर देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी या आरोपींना फाशी दिल्याचं कौतुक केले. अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला अशी भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली.
9 / 10
१६ डिसेंबर २०१२ पूर्वीचे त्याचे आयुष्य वेगळे होते, दिल्लीपासून २४० किलोमीटर अंतरावर खेड्यात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलाने वयाच्या ११ व्या वर्षी आपले घर सोडले होते. दिल्लीहून घरी आल्यावर तिहारमध्ये आत्महत्या केलेल्या निर्भया घटनेतील आरोपी रामसिंगसोबत त्याची पहिली भेट झाली होती.
10 / 10
रामसिंगने त्याला बसची साफसफाई करण्याचं काम दिलं होतं. येथून त्याची नोकरी सुरू झाली. ज्या बसच्या सफाईचं काम त्याला दिलं होतं. त्याच बसमध्ये १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री निर्भया या अल्पवयीन मुलासह सामूहिक बलात्कार करण्यात आला.
टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय