देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:02 PM2023-10-12T12:02:32+5:302023-10-12T12:14:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी देवभूमी उत्तराखंडच्या पिथौरागड येथे जाऊन दर्शन घेतले. येथील पार्वती कुंडमध्ये जाऊन त्यांनी पूजा-आरती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी देवभूमी उत्तराखंडच्या पिथौरागड येथे जाऊन दर्शन घेतले. येथील पार्वती कुंडमध्ये जाऊन त्यांनी पूजा-आरती केली.

यावेळी, मोदींचा विशेष हटके लूक पाहायला मिळाला. तर, पंतप्रधानांनी डमरु आणि घंटाही वाजवला. येथील दर्शनानंतर मोदी हे गुंजी गावात जाणार आहेत.

तेथे सैन्य दलाच्या जवानांसह आयटीबीपी आणि बीआरओंसह स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.

मोदींनी आज सकाळी जोलिंगकोंग येथे जाऊन प्रभू कैलास यांची पूजा अर्चना केली. यावेळी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही मोदींसमवेत उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी उत्तराखंड येथील कैलास पर्वतरागांचे दर्शन घेतले. भारत आणि चीनच्या सीमारेषेवर हे कैलास पर्वत आहेत.

येथून २० किमीच्या अंतरावर चीनची सीमा सुरू होते. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या पर्वत दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, दुपारी २ वाजताच्या सुमारास मोदी पिथौरगड येथे जाणार असून येथील पायाभूत सुविधांसंबंधित जवळपास ४२०० कोटींच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्मोडातील जागेश्वर धाम येथील मंदिरातही पोहोचणार आहेत.

जवळपास ६२०० फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये अंदाजे २२४ प्रकारच्या दगडांचे मंदिर आहेत.