शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी-शहांची डीनर डिप्लोमसी; मित्रपक्षांसमोर मांडला 2022 पर्यंतचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 3:59 PM

1 / 8
एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या कलांमुळे भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रित केले होते. या मेजवानीमध्ये एनडीएचे बहुतांश घटक पक्ष सहभागी झाले होते.
2 / 8
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लंडनहून मायदेशी परतल्यानंतर थेट दिल्ली गाठली आणि मेजवानीला उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला.
3 / 8
लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी बोलवलेल्या या डीनरला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा उपस्थित होते.
4 / 8
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे सुद्धा एनडीएच्या बैठकीस उपस्थित होते.
5 / 8
नरेंद्र मोदींचा सत्कार करताना अण्णा द्रमुक पक्षाचे नेते
6 / 8
एनडीएच्या मेजवानीमध्ये नरेंद्र मोदींचा सत्कार करताना अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल आणि कुटुंबीय
7 / 8
एनडीएतील मित्रपक्षांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील पाच वर्षांसाठी रणनीती ठरवण्यात आली. आता गुरुवारी एनडीएच्या बाजूने मतदारांचा कौल लागल्यास मंत्रिमंडळात काही नव्या सदस्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर 2022 चे लक्ष्य असेल.
8 / 8
2022 मध्ये देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असून, त्यावेळी देशातील जनतेला गरिबीपासून स्वातंत्र्य मिळावे, तसेच अन्न, वस्र, निवारा यांचा कुठेही अभाव असता कामा नये, अशी मोदींची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी मिशन 2022 आखले आहे.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा