....म्हणून मोदी म्हणाले अमित शहा आहेत भाजपाचे 'मॅन ऑफ द मॅच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:13 IST2017-10-16T19:10:50+5:302017-10-16T19:13:53+5:30

2014 लोकसभा निवडणुकीच्यावेळी अमित शहांकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या निकालाने संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला. 80 पैकी भाजपाचे तब्बल 71 खासदार या राज्यातून निवडून आले.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांची निवड झाली आणि संपूर्ण देशात भाजपाचा झंझावात सुरु झाला. अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र आणि अत्यंत विश्वासू सहकारी आहेत.
अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये स्वबळावर सरकार स्थापन झाले. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि मणिपूरमध्ये भाजपाने आघाडी करुन सरकार स्थापन केले. दिल्ली, बिहारमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला.
मागच्या 20 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. सहाजिक इतकी वर्ष सरकार असल्यानंतर प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते. या लाटेवर मात करुन सरकार टिकवण्याचे आव्हान शहांसमोर आहे.