शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजही आपल्याला जगणं कसं असावं हे शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:33 AM

1 / 18
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ व्या महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचे विचार, त्यांचं देशाला घडवणारं कार्य या निमित्ताने नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या विचारांनी आजही लोकांना प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांचे विचार पुन्हा पुन्हा या ना त्या निमित्ताने सोशल मीडियातही शेअर केले जातात. माणसाला माणसासारखं जगायला शिकवणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे असेच काही विचार...
2 / 18
मी अशा धर्माला मानतो जो धर्म, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
3 / 18
जर मला असं वाटलं की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे, तर मी ते सर्वात आधी मी जाळेन. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
4 / 18
जीवन लांब असण्यापेक्षा महान असावं. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
5 / 18
आपण सर्वात आधी आणि सर्वात शेवटी भारतीय आहोत. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
6 / 18
बुद्धीचा विकास हा मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष्य असलं पाहिजे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
7 / 18
जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
8 / 18
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
9 / 18
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
10 / 18
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
11 / 18
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12 / 18
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
13 / 18
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
14 / 18
स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
15 / 18
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
16 / 18
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
17 / 18
लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
18 / 18
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीhistoryइतिहास