मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 00:52 IST2025-12-17T00:08:22+5:302025-12-17T00:52:45+5:30

Lionel Messi Vantara Visit Photo Album: स्टार फुटबॉलर मेस्सीने अनंत अंबानी यांच्या वनतारा अभयारण्याला भेट दिली. यावेळी त्याने हिंदू देवदेवतांची पूजा आणि आरतीही केली.

जगातील महान फुटबॉलर लिओनेल मेस्सीने भारत दौऱ्यावर असताना बुधवारी वन्यजीवांसाठी आश्रयस्थान असलेल्या वनतारा अभयारण्याला भेट दिली.

मेस्सीने जेव्हा वनतारा अभयारण्यात पाऊल ठेवले तेव्हा अनंत अंबानी यांनी त्याची गळाभेट घेतली आणि अतिशय प्रेमाने सर्वांचे स्वागत केले.

मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल या सर्वांचे भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

वनतारामध्ये या खास पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट अंबानी दोघेही जातीने हजर होते.

वनतारामध्ये प्रवेश करताच मेस्सीने दर्शनी भागात असलेल्या गणपतीबाप्पाला नमस्कार केला.

वनतारामध्ये विविध हिंदू देवदेवतांची मंदिरे आहेत. सनातन धर्मानुसार, हिंदू देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन मेस्सीने या भेटीला सुरूवात केली.

वनताराच्या आतल्या बाजूला आल्यानंतर मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा, शिवाभिषेक आणि महाआरती केली.

वनतारामध्ये प्रवेश केल्यानंतर मेस्सी आणि त्याचे साथीदार वन्यजीवांशी खेळण्यात रमल्याचे दिसले.

मेस्सीने वन्यप्राण्यांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. तसेच जिराफाला आपल्या हाताने खाद्य देण्याचाही आनंद लुटला.

फुटबॉलच्या मैदानात वाघाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघावर चाल करून जाणारा मेस्सी वनतारामध्ये खऱ्या वाघाशी खेळताना दिसला.

वनताराची खासियत असलेल्या व्हाईट टायगरसोबतही मेस्सीने खास फोटोशूट केले.

त्याशिवाय, जंगलाचा राजा सिंह याच्यासोबत फुटबॉलच्या मैदानाचा राजा असलेल्या मेस्सीने वेळ घालवला

मेस्सी आपल्या फुटबॉल स्किल्स दाखवताना दिसला. त्याने उपस्थितांनाही फुटबॉल खेळण्याबाबत टिप्स दिल्या.