ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:45 PM2023-09-16T18:45:50+5:302023-09-16T18:56:43+5:30

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अर्थात 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अर्थात 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने मेगा प्लॅन आखला असून विशेष कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. या पार्श्वभूमीवर आम्हीही आपल्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत.

खरे तर, अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित नव-नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात आणि हा फोन कुणी तयार केला आहे...? आपल्याला माहीत आहे का?

माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी सॅटॅलाइट अथवा RAX (रेस्ट्रिक्टेड एरिया एक्सचेन्ज) फोनचा वापर करतात. एवढेच नाही, तर संबंधित वृत्तांमध्ये या फोनच्या काही वैशिष्ट्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अशी आहे मोबाइलची खासियत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेत, हा फोन तयार करण्यात आला आहे. हे एक एन्क्रिप्टेड डिव्हाइस आहे. यात एका विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदींसाठी तयार करण्यात आलेला हा फोन हॅक अथवा ट्रेस करणे अशक्य आहे. कारण हा फोन मिलिटरी फ्रिक्वेन्सी बँडवर काम करतो.

फोनचं नाव काय? - माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जो फोन वापरतात, त्याचे नाव 'रुद्र', असे आहे आणि हा फोन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केला आहे.

महत्वाचे म्हणजे, हा एक अँड्रॉयड मोबाईल फोन आहे. मात्र यात एका खास ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आली आहे. जी अत्यंत सुरक्षित आहे. तसेच या डिव्हाइसमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. सुरक्षितता आणि सायबर हल्ल्यांपासून बचावाच्या दृष्टीने या रुद्र फोनमध्ये इन बिल्ट सिक्योरिटी चिप लावण्यात आल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? याचे कोणतेही नेमके अथवा योग्य उत्तर नाही. कारण माध्यमांतील वृत्तांमधून नेहमीच वेग-वेगळी माहिती समोर आली आहे. तसेच, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्थात DEITY सारख्या संस्था नेहमीच यावर लक्ष ठेवून असतात.