JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:15 AM2021-03-24T09:15:38+5:302021-03-24T09:30:08+5:30

India Post Jobs : भारतीय टपाल विभागात बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी पास तरुणांना पोस्टात (India Post Office) नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत.

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी(Gramin Dak Sevak) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. यामुळे आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.

टपाल खात्याने नोटिफिकेशन जारी करून भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी पोस्ट विभागात 1137 पदांची भरती आहे. मात्र यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज घेतले जाणार आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदासाठी पगाराची मर्यादा 10,000 ते 12,000 रुपये असेल. याशिवाय केंद्र सरकारचे इतर भत्तेही मिळणार आहेत.

आपल्याकडे देशातील कोणत्याही शिक्षण मंडळाचे दहावी उत्तीर्ण मार्कशीट असावे. दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. दहावीत गणित, इंग्रजी आणि स्थानिक भाषा असणं महत्त्वाचं आहे.

विशेषत: स्थानिक भाषा 10 वी पर्यंत असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. यासाठी कोणत्याही शासकीय किंवा खासगी संस्थांकडून किमान 60 दिवस संगणक प्रशिक्षण कोर्स असणे बंधनकारक आहे.

टपाल खात्यात या रिक्त जागांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. ही भरती छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये (Chhattisgarh Postal Circle) केली जाईल.

भारतीय टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी 8 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2021 आहे.

सर्वसाधारण उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

भरतीसंदर्भात सर्व माहिती आणि Online Application ची लिंक ही अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. तिथे इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.