"मी उत्सुकतेपोटी पाहिलेला बॉलिवूडचा तो शेवटचा सिनेमा, पण फ्लॉप ठरला"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:42 AM2023-08-10T08:42:24+5:302023-08-10T08:52:04+5:30

सिनेमा हा भारतीयांच्या मनोरंजनाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते उद्योगपती, अधिकारी आणि राजकारणीही बॉलिवूडच्या सिनेमांतून आपलं मनोरंजन करतात.

सिनेमा हा भारतीयांच्या मनोरंजनाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते उद्योगपती, अधिकारी आणि राजकारणीही बॉलिवूडच्या सिनेमांतून आपलं मनोरंजन करतात.

त्यामुळे, काही चित्रपट आवर्जून पाहिले जातात. अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि सनी देओलचा गदर २ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

त्याच अनुषंगाने आयआयए इंडियाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये, फडणवीसांना अलिकडे पाहिलेला आणि एन्जॉय केलेला सिनेमा कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर, फडणवीसांनी चित्रपटाचे नाव न घेता तो चित्रपट मी पाहिला पण एन्जॉय नाही केला. तर, तो चित्रपट प्लॉप ठरल्याचं म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांनी चित्रपटामुळे माझी निराशा झाल्याचं म्हटलं. तसेच, मी चित्रपटाचं नाव घेऊ इच्छित नाही, असेही त्यांनी म्हटलं.

मात्र, एँकरने आदि म्हणत त्या चित्रपटावर भाष्य केलं. त्यानंतर, आदि का अंत हो गया... असे उत्तर फडणवीसांनी दिले. त्यावरुन, हा चित्रपट आदिपुरुष असल्याचं समजून येतं.

आदिपुरुष या बिग बजेट चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, चित्रपटातील डॉयलॉगमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर हिंदुतत्त्वादी संघटनांकडून चित्रपटाचे शोही बंद पाडण्यात आले.

विशेष म्हणजे न्यायालयाने या चित्रपटातील संवादावरुन दिग्दर्शक आणि संवादलेखकाला सुनावले होते. त्यानंतर, चित्रपटातील संवाद बदलण्यात येणार असल्याचे मनोज मुंतशीर यांनी सांगितले होते.

देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. मुंबईतील कोस्टल रोड ते उद्योग जगतातील फॉक्सकॉनपर्यंतच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

तसेच, आघाडी व युतीवरही त्यांनी भाष्य केलं. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना आत्तापर्यंत आवडलेली किंवा लक्षात राहिलेली एखादी जाहिरात कोणती असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी अमुल ब्रँडच्या जाहिरतीचे उत्तर दिले.