आंध्र प्रदेशातल्या विजयवाडापासून अमरावतीपर्यंत धावणार देशातील पहिली हायपरलूप ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 20:27 IST2017-09-11T20:24:28+5:302017-09-11T20:27:38+5:30

बुलेट ट्रेनहून वेगानं धावणा-या हायपरलूप ट्रेनला भारतातल्या केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे.

आंध्र प्रदेशमधलं विजयवाडा व अमरावती ही शहरं हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत.

हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासाचं एक तासाचं अंतर कमी होऊन पाच ते सहा मिनिटांवर येणार आहे.

आंध्र प्रदेश सरकारनं हायपरलूप ट्रेनसाठी अमेरिकन कंपनी हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीशी करार केला आहे.

फिजिबिलिटी चाचणीचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या फिजिबिलिटी चाचणीनंतर भारत स्वतःची पहिली हायपरलूप ट्रेन बनवण्यास सुरुवात करणार आहे.