टाटानं केला भारतीय रेल्वेसोबत १४५ कोटींचा करार; महाराष्ट्रात नवा प्लांट उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:44 IST2022-08-01T16:27:45+5:302022-08-01T16:44:22+5:30

देशातील सर्वात विश्वासार्ह स्टील कंपनी टाटा स्टीलला भारतीय रेल्वेच्या 'वंदे भारत एक्सप्रेस' या अत्याधुनिक ट्रेनसाठी सीट तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आसन १८० डिग्रीपर्यंत फिरवता येणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासून रेल्वेला या विशेष आसनांचा पुरवठा सुरू होणार आहे. मात्र, देशातील ही अशा प्रकारची पहिलीच आसनव्यवस्था असेल. जवळपास १४५ कोटी रुपयांचा करार टाटा स्टील आणि भारतीय रेल्वे यांच्यात झाला आहे.

टाटा स्टीलचे उपाध्यक्ष (तंत्रज्ञान आणि नवीन साहित्य व्यवसाय) देबाशीष भट्टाचार्य म्हणतात की, कंपनीच्या कंपोझिट विभागाला वंदे भारत एक्सप्रेसच्या २२ गाड्यांसाठी सीट उपलब्ध करून देण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. ही ऑर्डर तयार करण्यासाठी सुमारे १४५ कोटी रुपये खर्च आला आहे.

देवाशिष भट्टाचार्य म्हणाले, 'या खास डिझाइन केलेल्या सीट आहेत. ही १८० अंशांपर्यंत फिरवता येतील आणि त्यांना विमानातील आसना यांसारख्या सुविधा देण्यात येतील. भारतातील ट्रेनच्या आसनांचा पुरवठा अशा प्रकारचा हा पहिला आहे. या जागांचा पुरवठा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार असून १२ महिन्यांत पूर्ण होईल.

वंदे भारत ट्रेनसाठी डिझाइन केलेल्या या सीट फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमरपासून बनवलेल्या आहेत. सोयीस्कर असण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेतही या आसनांचा हातभार लागेल. संपूर्ण देशांतर्गत विकसित वंदे भारत ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावू शकते. ही देशातील सर्वात वेगवान गाड्यांपैकी एक आहे.

टाटा स्टील २०२५-२६ पर्यंत संशोधन आणि विकास कार्यांवर ३००० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. २०३० पर्यंत टाटा स्टीलला जागतिक स्तरावर टॉप ५ स्टील कंपन्यांमध्ये नेण्याच्या लक्ष्याचा हा एक भाग आहे. कंपनी संशोधन आणि विकासावर अधिक लक्ष दिले जात आहे असं भट्टाचार्य म्हणतात.

महाराष्ट्रात तयार होणार प्लांट - टाटा स्टीलचे उपाध्यक्ष म्हणतात की टाटा स्टील सँडविच पॅनेल तयार करण्यासाठी टाटा स्टील महाराष्ट्रातील खोपोली येथे नवीन प्लांट उभारत आहे. यामध्ये नेदरलँडची एक कंपनी टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्लांटमध्ये बनवलेल्या सँडविच पॅनल्सचा वापर रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी केला जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही विशेष काळजी घेण्यात आली आहे. भारतात प्रथमच या सीट्स पुरवठा केला जाणार आहे.

















