पाहा कसा आहे जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वेचा Arch of Chenab Bridge

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:09 PM2021-04-07T15:09:38+5:302021-04-07T15:12:23+5:30

जम्मू काश्मीरसाठी हा ब्रिज अतिशय फायद्याचा ठरणार आहे.

भारतीय रेल्वेनं कटरापासून बनिहाल सेक्शनपर्यंत उभारल्या जात असलेल्या Arch of Chenab Bridge चं काम पूर्ण केलं आहे. . (सर्व फोटो - एएनआय, पीटीआय, भारतीय रेल्वे)

हा जगातील सर्वात उंच Arch Bridge आहे. हा उधमपूर. श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक योजनेचा भाग असून याद्वारे कटरापासून थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे नेता येऊ शकते.

Arch of Chenab Bridge हा जम्मू काश्मीरमधील रेल्वेचं जाळं अधिक मजबूत करण्यास मदत करेल. याशिवाय राज्याच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

हा ब्रिज तयार झाल्यामुळे खोऱ्याला ट्रेन सेवांशी जोडणं शक्य आहे. तसंच अन्य आर्थिक देवाणघेवाणीलाही चालना मिळणार आहे.

हा ब्रिज चिनाब नदीवर उभारण्यात आला आहे. हा ब्रिज ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी पर्वतांची जमीन ही कच्ची आहे.

तसंच अनेक आव्हानं पार करून हा ब्रिज तयार करण्यात आला आहे. केबलच्या सहाय्यानं हा ब्रिज तयार करण्यात आला आहे.

Arch of Chenab Bridge हा आयफेल टॉव्हरपेक्षाही ३५ मीटर उंच आहे. १३१५ मीटर लांब या ब्रिजसाठी १२५० कोटी रूपयांचा खर्च आला आहे.

इंजिनिअरींगचा उत्तम नमूना म्हणून याकडे पाहिलं जात आहे. ब्रिजच्या Arch ला दोन्ही बाजूंनी जोडण्यातही आलंय.

याशिवाय उणे २० अंश सेल्सिअस तापमानाचाही यावर परिणाम होणार नाही असं म्हटलं जातं.

तसंच २५० किलोमीटर प्रति तास वेगानं येणाऱ्या हवेमुळेही या ब्रिजचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं सांगण्यात येतंय.