By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 08:27 IST
1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतासह जगभरात मोठे फॉलोअर्स आहे. २०१४ साली भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले होते. त्यानंतरच्या काळात पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत विराजमान झाले आहेत. 2 / 10आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल १० कोटी फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे इतका मोठी फॉलोअर्स संख्या असणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिलेच नेते बनले आहे. मोदी यांच्या या कामगिरीने जागतिक डिजीटल प्रेझेंसमध्ये त्यांचे नाव टॉपवर पोहचले आहे. 3 / 10२०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे मेटाच्या मालकीचे असलेल्या इन्स्टाग्रामवर ज्वाईन झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत मोदी यांचे फॉलोअर्स सातत्याने वाढत आहेत. मोदी यांनी जगातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे सोडले आहे. ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोदींचे बनले आहेत.4 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ४ कोटी ३२ लाख फॉलोअर्ससह डोनाल्ड ट्रम्प यांचा या यादीत दुसरा नंबर लागतो. त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत. ब्राझीलच्या अध्यक्षांना १ कोटी ४० लाख लोक फॉलो करतात. 5 / 10तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांचे इन्स्टाग्रामवर १ कोटी १६ लाख फॉलोअर्स तर अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांचे ६४ लाख फॉलोअर्स आहेत. या पाच नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या मोदींच्या वैयक्तिक फॉलोअर्स संख्येपेक्षा कमी आहे.6 / 10भारतात नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांमधील अंतरही खूप मोठे आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे १.६१ कोटी फॉलोअर्स आहेत तर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सुमारे १.२६ कोटी फॉलोअर्स आहेत.7 / 10वेगवेगळ्या सर्वेक्षणात निवडक जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर मान्यता रेटिंगमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. स्टेटिस्टाच्या मते, डिसेंबर २०२५ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ७० टक्के मान्यता रेटिंग होते, ज्यामुळे ते यादीत अव्वल स्थानावर होते.8 / 10जपानचे पंतप्रधान साने ताकायची ६३ टक्के मतांसह दुसऱ्या तर अर्जेंटिनाचे जेवियर मायलेई ६० टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या यादीत ४३ टक्के मतांसह ११ व्या क्रमांकावर आहेत.9 / 10अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजेंस फर्म मॉर्निंग कन्सल्टने २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणांवर आधारित मोदी ६७ टक्के मान्यता रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. झेक रिपब्लिकचे आंद्रेज बाबिस ५९ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. साने ताकायची ५६ टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत तर ट्रम्प ४० टक्के मतांसह ११ व्या क्रमांकावर आहेत.10 / 10मॉर्निंग कन्सल्टच्या २०२५ च्या आकडेवारीनुसार मोदी ७५ टक्के मतांसह 'डेमोक्रॅटिक लीडर अप्रुवल रेटिंग्ज' यादीत अव्वल स्थानावर आहेत तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग ५९ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प ४५ टक्क्यांपेक्षा कमी मतांसह आठव्या क्रमांकावर आहेत.