अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "मुंबई आली की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:27 IST2025-04-01T09:21:15+5:302025-04-01T09:27:15+5:30

Sunita Williams: भारताच्या कन्या सुनीता विल्यम्स अमेरिकेत राहूनही त्यांचे देशावर प्रेम आहे. त्यांना भारताचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विल्यम्स यांच्या ओठांवर केवळ भारताचेच नाव होतं.

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नुकतेच पृथ्वीवर सुखरूप परतले. यावेळी, विल्यम्स आणि विल्मोर यांनी १२१ दशलक्ष मैलांपेक्षा जास्त प्रवास केला. पृथ्वीभोवती ४,५७६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि एकूण २८६ दिवस अवकाशात घालवले.

पृथ्वीवर परतल्यानंतर पहिल्यांदाच नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

अंतराळातून भारत कसा दिसतो असा प्रश्न यावेळी सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आला. तेव्हा सुनीता यांनी दिलेल्या उत्तराने सर्वच भारतीयांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं.

भारत अप्रतिम आहे. जेव्हाही आम्ही हिमालयात गेलो तेव्हा आम्हाला अविश्वसनीय फोटो मिळाले. ही हिमालयाची लाट भारतभर पसरल्यासारखी दिसते, असं सुनीता विल्यम्स म्हणाल्या.

अंतराळातून भारताकडे पाहिल्यास असे दिसते की, मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत दिव्यांचे जाळे तयार झाले आहे, असंही सुनीता विल्यम्स म्हणाल्या.

सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीच्या कक्षेतून दिसणाऱ्या रंगांबद्दल सांगितले जेव्हा आंतरराष्ट्रीय गुजरात आणि मुंबईच्या वरुन जात होते.

भारतामध्ये अनेक रंग आहेत. जेव्हा तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यावर किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या नौकांचा ताफा गुजरात आणि मुंबई आल्याचे संकेत देतो," असं विल्यम्स यांनी म्हटलं.

मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत संपूर्ण भारतभर दिव्यांचे जाळे आहे, जे रात्रीच्या वेळी अविश्वसनीय दिसते. दिवसा हिमालय पाहणे खूप छान होते.

मी माझ्या वडिलांच्या देशातभारतात नक्कीच जाईन. भारतीय अंतराळवीर लवकरच Axiom मोहिमेवर जाणार याबद्दल तेथील लोक उत्सुक आहेत. हे छान आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र त्यांच्या दृष्टीकोनातून किती आश्चर्यकारक आहे हे ते सांगू शकतील.

मला आशा आहे की मी त्यांना कधीतरी भेटू शकेन आणि आम्ही आमचे अनुभव भारतातील अधिकाधिक लोकांसोबत शेअर करू शकेन भारत एक महान देश आहे आणि एक अद्भुत लोकशाही आहे जी अंतराळ देशांमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही याचा एक भाग होऊन भारताला मदत करू इच्छितो, असं सुनीता विल्यम्स म्हणाल्या.